

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2022 च्या 43 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सहा विकेट्सने पराभव केला. बंगळूरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने 19.3 षटकांत चार गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग करत 174 धावा केला. राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलर यांनी पुन्हा एकदा गुजरातच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अखेर दोघांनी 40 चेंडूत 79 धावांची नाबाद भागीदारी केली. तेवतियाने 25 चेंडूत 43 धावा तर मिलर 24 चेंडूत 39 धावा करून नाबाद राहिला.
या विजयासह गुजरातने नऊ पैकी आठ सामने जिंकून प्लेऑफसाठी जवळपास पात्रता मिळवली आहे. गुजरातचे नऊ सामन्यांनंतर 16 गुण झाले आहेत. त्याचवेळी आरसीबीचा 10 सामन्यांमधला हा पाचवा पराभव ठरला. संघ सध्या पाच विजय आणि 10 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
13 षटकांनंतर गुजरात टायटन्सने चार गड्यांच्या मोबदल्यात 96 धावा केल्या. वनिंदू हसरंगाने साई सुदर्शनला बदली यष्टीरक्षक अनुज रावतकरवी झेलबाद केले. सुदर्शन 14 चेंडूत 20 धावा करून माघारी परतला. त्याने दोन चौकार लगावले.
गुजरातला 11व्या षटकात 78 धावांवर तिसरा धक्का बसला. आयपीएलचा 100 वा सामना खेळत असलेला हार्दिक पंड्या पाच चेंडूत तीन धावा करून बाद झाला. महिपाल लोमरोरच्या हाती त्याला शाहबाज अहमदने झेलबाद केले. शाहबाजला मिळालेले हे दुसरे यश होते. यापूर्वी त्याने शुभमन गिललाही बाद केले होते. 11 षटकांनंतर गुजरातची धावसंख्या 3 बाद 82 अशी होती.
गुजरात टायटन्सला दुसरा धक्का नवव्या षटकात 68 धावांवर बसला. दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. वृद्धिमान साहा (29) नंतर शुभमन गिलही पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला 28 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 31 धावा करता आल्या. त्याला शाहबाज अहमदने अल्बडब्लू आऊट केले.
आठव्या षटकात 51 धावांवर गुजरात टायटन्सला पहिला धक्का बसला. वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि अर्धशतकी भागीदारी केली. ही भागीदारी मिस्ट्री स्पिनर वनिंदू हसरंगाने फोडली. त्याने ऋद्धिमान साहाला रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. साहाला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. तो 22 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 29 धावा करून बाद झाला. आठ षटकांनंतर गुजरातची धावसंख्या एका विकेटवर 55 धावा होती.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंगळूरने 20 षटकांत 6 गडी गमावून 170 धावा केल्या. आरसीबीची सुरुवात खराब झाली. कर्णधार फाफ डू प्लेसिस दुसऱ्याच षटकात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला प्रदीप संगवानने यष्टिरक्षक रिद्धिमान साहाच्या हाती झेलबाद केले. यानंतर विराट कोहलीने रजत पाटीदारसह दुसऱ्या विकेटसाठी 74 चेंडूत 99 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीने या मोसमातील पहिले अर्धशतक आणि आयपीएल कारकिर्दीतील 43 वे शतक झळकावले. त्याचवेळी रजतने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही झळकावले. रजत 32 चेंडूत 52 धावा काढून बाद झाला. त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले.
यानंतर विराट कोहलीही 53 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत सहा चौकार आणि एक षटकार लगावला. ग्लेन मॅक्सवेलने चांगली सुरुवात केली पण त्याला मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. मॅक्सवेलने 18 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. दिनेश कार्तिक सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला आणि दोन धावा करून बाद झाला. महिपाल लोमरने अखेरच्या षटकात आक्रमक खेळी खेळली आणि आठ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 16 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या चेंडूवर लोमरर बाद झाला. शाहबाज अहमद दोन धावांवर नाबाद राहिला. गुजरातकडून वेगवान गोलंदाज प्रदीप संगवानने दोन बळी घेतले. तर मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, रशीद खान आणि लोकी फर्ग्युसन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
कर्णधार पांड्याची विकेटनंतर साई सुदर्शन २० धावा करून बाद झाला.
शुभमन गिल बाद झाल्यानंतर संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मागील सामन्यात हार्दिकने शानदार खेळी केली होती. तो चांंगल्या लयीत खेळत होता. या सामन्यातदेखील हार्दिककडून आक्रमक खेळीची अपेक्षा संघाचे चाहते करत होतो. परंतु बंगळूरच्या गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यापुढे जास्त काळ टिकू शकला नाही. त्याला शाहबाज अहमदने बाद केले.
वृद्धीमान साहाच्या पाठोपाठ शुभमन गिलची विकेट घेऊन बंगळूरच्या गोलंदाजांनी गुजरातच्या सलामीवीरांना तंबूचा रास्ता दाखवला.
बंंगळूरने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वृद्धीमान साहाच्या रूपात गुजरात पहिला धक्का बसला. तो २९ धावा करून बाद झाला
लोकी फर्ग्युसनने बंगळूरला पाचवा धक्का दिला. त्याने ग्लेन मॅक्सवेलला 33 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचा झेल राशिद खानने घेतला. 19 षटकांनंतर बंगळूरची धावसंख्या 5 बाद 155 होती.
विराट कोहली 17 व्या षटकात बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने क्लीन बोल्ड केले. बाद होण्यापूर्वी कोहलीने 53 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 58 धावा केल्या. 17 षटकांनंतर बंगळूरची धावसंख्या 3 बाद 136 होती.
15 व्या षटकात 110 धावांवर बंगळूरला दुसरा धक्का बसला. युवा फलंदाज रजत पाटीदार 32 चेंडूत 52 धावा काढून बाद झाला. यात पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक होते. रजतने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 74 चेंडूत 99 धावांची भागीदारी केली.
विराटने या हंगामातील पहिलेच अर्धशतक झळावले. यासोबतच कोहलीनेही फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. विराटच्या अर्धशतकावर पत्नी अनुष्का शर्माने जोरदार जल्लोष केला. ती खूप आनंदी दिसत होती. 15 षटकांनंतर बंगळुरूची धावसंख्या दोन बाद 117 होती.
13 षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एका विकेटच्या मोबदल्यात 102 धावा केल्या. विराट कोहली फॉर्ममध्ये आला आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 53 वे अर्धशतक झळकावले. कोहलीने 45 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने आतापर्यंत सहा चौकार आणि एक षटकार मारला. त्याचवेळी, रजत पाटीदार 27 चेंडूत 46 धावा करून क्रीजवर होता. त्यात चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 90 हून अधिक धावांची भागीदारी झाली.
वेगवान गोलंदाज प्रदीप संगवानने हंगामातील आपला पहिला सामना खेळत असताना बंगळूरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला यष्टिरक्षक रिद्धिमान साहाकरवी झेलबाद केले. डुप्लेसिसला खातेही उघडता आले नाही. दोन षटकांनंतर बंगळूरची धावसंख्या एका विकेटवर 11 धावा होती.
गुजरातबद्दल बोलायचे झाले तर या संघाने 8 पैकी 7 सामने जिंकले असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. हा सामना जिंकून गुजरात संघ प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास पक्के करेल. तर दुसरीकडे बंगळूरचा संघ पराभवाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करेल. आरसीबीने मागील दोन सामने गमावले आहेत.
गुजरात संघाने सामन्यात दोन बदल केले आहेत. यश दयाल आणि अभिनव मनोहर यांच्या जागी प्रदीप सांगवान आणि साई सुदर्शन यांची निवड करण्यात आली आहे. तर आरसीबीमध्ये सुयश प्रभुदेसाईच्या जागी महिपाल लोमरोरला संधी मिळाली आहे.
हार्दिक पंड्याचा हा 100 वा आयपीएल सामना आहे. त्याने आतापर्यंत 99 सामन्यात 30.19 च्या सरासरीने आणि 150.8 च्या स्ट्राईक रेटने 1781 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 91 असून सात अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याचबरोबर हार्दिकच्या नावावर 46 विकेट्स आहेत. गोलंदाजीत हार्दिकची सर्वोत्तम कामगिरी 20 धावांत तीन बळी अशी आहे.
गुजरातचा संघ :
शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, प्रदीप संगवान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी
बंगळूरचा संघ :
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड