

पुढारी ऑनलाइन डेस्क : Gujarat Heavy Rain : गुजरातमधील नाडियाद येथे शनिवारी सकाळी मुसळधार पावसामुळे एक बस नाल्यात अडकली. बसमधील विद्यार्थ्यांनी खाली नाल्यात पडू नये म्हणून त्यांना खिडक्यांद्वारे बसमधून बाहेर काढण्यात आले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे.
गुजरातमधील नडियाद शहरात शनिवारी सकाळी मुसळधार पावसाने अनेक भागात पूरस्थिती निर्माण केली. पुरामुळे नडियादच्या खेडा येथे कॉलेजची बस नाल्यात अडकल्याने यातील विद्यार्थ्यांना बाहेर पडणे कठीण झाले. त्यानंतर स्थानिकांनी लोकांनी बस अडकलेली पाहून विद्यार्थ्यांना आपत्कालीन खिडक्यांमधून बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पावसाच्या पाण्याने भरलेल्या नाल्यातून जात असताना अडकली.
गेल्या आठवड्यात गुजरातच्या कच्छ, सौराष्ट्र किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळ (15 जून) धडकले होते. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून जखाऊ बंदर, कच्छ तसेच अन्य काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडपडी होऊन वीजेचे खांब सुद्धा कोसळले.
चक्रीवादळ दोन दिवसातच शमले असले तरी त्याचा परिणाम म्हणून गुजरातच्या काही भागात अजूनही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे.
हे ही वाचा :