ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर खासगी ट्रव्हल्सकडून लुट!

File Photo
File Photo
Published on
Updated on

मुंबई: सुरेखा चोपडे : राज्यातील विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी ( दि. १८ ) मतदान होणार आहे. मुंबईतून शनिवारी रात्री तब्बल साडे तीन हजार ट्रव्हल्स राज्यातील विविध जिल्ह्याकरिता रवाना झाल्या. त्यापैकी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी सर्वाधिक ट्रव्हल्स गेल्या आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी, १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. कोल्हापूर ,रायगड,बीड ,सांगली,सिधुदुर्ग, नाशिक,अमरावती,सोलापूर,अहमदनगर,अकोला,वाशिम, धुळे,वर्धा, बुलढाणा,रत्नागिरी या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचा घुरळा रविवारी उडणार आहे. त्यामध्ये आपला सहभाग दर्शविण्यासाठी, आपल्या उमेदवाराला मत देण्यासाठी मुंबईकर गावाकडे रवाना झाले आहेत.

प्रवाशांची गर्दी पाहता ट्रव्हल वाहतुकदारांनी देखील तिकीट दरात भरमसाठ वाढ केली आहे. शनिवारी रात्री मुंबई ते कोल्हापूर एसी स्लीपर ट्रव्हल्सकरिता दोन ते अडीच हजार रुपये तिकीट आकारण्यात आले. तर नॉन एसी ट्रव्हल्स करिता १३०० ते १५०० रुपये तिकीट दर होता. हीच परिस्थिती सांगली,रत्नागिरी,बीड,सिधुदुर्ग,सोलापूर,अमरावती, अहमदनगरकरिता होती. एरव्ही मुंबई ते कोल्हापूर एसी स्लीपरकरिता एक हजार ते १२०० रुपये तिकिट दर असतो.

मार्ग, एसी स्लीपर, नॉन एसीचे दर

मुंबई ते कोल्हापूर- २ हजार ते २५०० रु, मुंबई ते रत्नागिरी १४००ते १६०० रु, मुंबई ते बीड १९०० ते २१००रु, मुंबई ते सिधुदुर्ग १४०० ते १६००रु, मुंबई ते अमरावती ३ हजार ते ३२००रु, मुंबई ते अहमदनगर ८०० ते १ हजार रु, मुंबई ते वाशीम १ हजार रु , मुंबई ते सोलापूर १५०० ते २ हजार रु असे भरमसाठ दर आकारले जात आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news