

पुढारी ऑनलाइन डेस्क : Good Friday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुड फ्रायडेच्या निमित्ताने प्रभू येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचे स्मरण केले. यावेळी त्यांनी "प्रभू ख्रिस्ताचे विचार लोकांना प्रेरणा देत राहोत" असे म्हटले आहे.
"आज गुड फ्रायडेच्या दिवशी, आम्हाला प्रभू ख्रिस्ताच्या त्यागाच्या भावनेचे स्मरण होते. त्यांनी वेदना आणि दुःख सहन केले परंतु सेवा आणि करुणेच्या त्यांच्या आदर्शांपासून कधीही विचलित झाले नाही. प्रभु ख्रिस्ताचे विचार लोकांना प्रेरणा देत राहोत," असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले.
आदल्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रसंगी ख्रिस्ताचे स्मरण केले आणि म्हटले, "हा गुड फ्रायडे प्रत्येक हृदय प्रेम, शांती आणि करुणेने भरून जावो."
गुड फ्रायडे, ज्याला होली फ्रायडे म्हणजेच पवित्र शुक्रवार किंवा ब्लॅक फ्रायडे म्हणूनही ओळखले जाते. जेव्हा येशू ख्रिस्त यांना वधस्तंभावर खिळले होते त्याला गुड फ्राय डे हा दिवस चिन्हांकित करतो. दरवर्षी यादिवशी येशू ख्रिस्ताला प्रार्थना करण्यासाठी देशभरातील चर्चमध्ये असंख्य लोक जमतात. तसेच वेगवेगळ्या चर्चमध्ये या दिवशी विशेष प्रार्थनेचे आयोजन केले जाते.
हे ही वाचा :