

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : शिक्षण क्षेत्रात मुलांपेक्षा मुली वेगाने प्रगती करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या घोषणेला सार्थ ठरवत आहेत. याचे उदाहरण गोंदियाच्या स्वर्णा नायडू या विद्यार्थिनीने सादर केले आहे. स्वर्णाला आस्ट्रेलिया येथे 2 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असून तिला ऑस्ट्रेलियाच्या वोलोंगॉन्ग विद्यापीठात डॉक्टरेटसाठी प्रवेश मिळाला आहे.