

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असते, भरपूर पैसा हवा असतो आणि जगातील सर्व सुखसोयींचा आनंद लुटायचा असतो. आपल्याकडे जेव्हा बाॅलीवूड सेलिब्रिटींसह माेठ्या उद्योजकांची लाईफ स्टाईल पाहिली की अनेकांना त्यांचे अनुकरण करावे. त्याच्या एवढेच पैसे आपल्यालाही मिळावे, असे वाटते. पण तुम्हाला वाचून एका महिला आपल्या श्वानाच्या जीवावर काेट्यवधी रुपये कमावत आहे. (Golden Retriever)
सध्या एक महिला आणि तिच लाडकं कुत्र सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या कुत्र्याच्या जीवावर ती वर्षाला काेट्यवधी रुपये कमावते. इंस्टाग्राम यूजर कोर्टनी बुडझिन ही टकर आणि टॉड नावाच्या दोन कुत्र्यांची मालकीण आहे. त्यांचा कुत्रा टकर हा गोल्डन रिट्रीव्हर जातीचा आहे. ताे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर कर्टनीला ३४ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात, कोर्टनीला टकरच्या प्रचंड फॅन फॉलोइंगचा माेठा फायदा हाेताे. (Golden Retriever)
अलीकडे, कोर्टनी न्यूयॉर्क पोस्ट वेबसाइटशी बोलताना म्हणाली की, ती आणि तिचा पती माईक टकरद्वारे किती पैसे कमवतात. तिने सांगितले की ती प्रायोजित YouTube पोस्टसाठी ३३ लाख ते ४९ लाख रुपये घेतात. याशिवाय ती इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करण्यासाठी १६ लाख रुपयांपर्यंत पैसे घेते.
कोर्टनी आधी सफाई कामगार होती आणि तिचा नवरा मेकॅनिकल इंजिनिअर होता. जून २०१८ मध्ये, जेव्हा टकर ८ आठवड्यांचा होता, तेव्हा तिने त्याला आपल्या घरी आणले आणि त्याच्यासाठी एक Instagram अकाउंट सुरु केले. त्याने त्याच्या वयाच्या दुसऱ्या वर्षापासून लाखोंमध्ये पैसे कमवू लागला. (Golden Retriever)
टकरचा पहिला व्हिडिओ जुलैमध्ये व्हायरल झाला होता. तो ६ महिन्यांचा होता तोपर्यंत त्याचे ६० हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. हळूहळू त्याची कमाई वाढू लागली. त्याने एका वर्षात तब्बल ८ कोटी रुपयांपर्यंत कमाई सुरू केली, तेव्हा बडझिन कोर्टनी आणि तिचा पती माईकने नोकरी सोडली. पूर्णवेळ टकरची काळजी घेणे आणि त्याच्या कमाई कशी वाढेल, याकडे लक्ष देणे यावरच या दाम्पत्याने आपले सर्व लक्ष केंद्रीत केले आहे. (Golden Retriever)