Gold Prices Today | सोन्याच्या दरात तेजी कायम, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

Gold Prices Today : सराफा बाजारात सोन्याच्या दरातील वाढ कायम आहे. सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. आज शुक्रवारी शुद्ध सोन्याचा दर वाढून प्रति १० ग्रॅम ५१,९०८ रुपयांवर पोहोचला. पण चांदीच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज शुक्रवारी शुद्ध सोन्याचा म्हणजे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५१,९०८ रुपये, २३ कॅरेट ५१,७००, २२ कॅरेट ४७,५४८ रुपये, १८ कॅरेट ३८,९३१ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३०,३६६ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा प्रति किलो दर ६१,१५४ रुपयांवर आहे.

सोन्याचे हे दर काल गुरुवारी (दि.६) अनुक्रम प्रति १० ग्रॅम ५१,८३८ रुपये, ५१,६३० रुपये, ४७,४८४ रुपये, ३८,८७९ रुपये, ३०,३२५ रुपये असे होते. चांदीचा दर गुरुवारी प्रति किलो ६०,६७० रुपयांवर जाऊन बंद झाला होता.

दरम्यान, आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर डिसेंबर फ्यूचर्स सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५१,९६५ रुपये होता. तर चांदीचा डिसेंबर फ्यूचर्स MCX वर २५४ रुपयांनी वाढून प्रति किलो ६१,६०० रुपयांवर व्यवहार करत होता. भारतात सोन्याच्या दर बदल होत असताना आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र दर स्थिर आहेत. (Gold Prices Today)

सोने आणखी महागणार

भारतात ऐन सणासुदीत सोने (Gold Rates) आणखी महाग होण्याची शक्यता आहे. त्याला कारण म्हणजे काही बँकांनी भारताला सोन्याचा पुरवठा कमी केला आहे. सोन्याचा पुरवठा करणार्‍या बँकांनी चीन, तुर्कस्तान आणि इतर बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले आहे. या देशांतून सोन्याला अधिक दर ऑफर केला जात आहे. तर ऐन सणासुदीच्या तोंडावर भारताला केला जाणारा पुरवठा कमी केला आहेत. तीन बँक अधिकारी आणि दोन व्हॉल्ट ऑपरेटरने याबाबतची माहिती दिली आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

शुद्ध सोन्याची पारख कशी कराल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news