Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर
पुढारी ऑनलाईन : सोन्याच्या दरात घसरण सुरु आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीच्या निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी सोन्याच्या दरावर दबाव वाढला. शुद्ध सोन्याचा दर आज प्रति १० ग्रॅम ५९ हजारांजवळ आला. काल मंगळवारी हा दर ५९,८५६ रुपयांवर बंद झाला होता. आज शुद्ध म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा दर ५०९ रुपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅम ५९,३४७ रुपयांवर होता. तर चांदीचा प्रति किलो दर ९९६ रुपयांनी कमी होऊन ७२,१७३ रुपयांवर होता. (Gold Price Today)
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ५९,३४७ रुपये, २३ कॅरेट ५९,१०९ रुपये, २२ कॅरेट ५४,३६२ रुपये, १८ कॅरेट ४४,५१० रुपये आणि १४ कॅरेट ३४,७१८ रुपयांवर खुला झाला. चांदीचा दर प्रति किलो ७२,१७३ रुपये आहे.
गुंतवणूकदार अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीबाबतच्या आगामी बैठकीची वाट पाहत आहे. या पार्श्वभूमीवर सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांनी एकूणच सावध भूमिका घेतली आहे आणि ते महागाई विषयक धोरण आणि संभाव्य दर वाढीबाबत फेडकडून मिळालेल्या कोणत्याही संकेतांचे बारकाईने निरीक्षण करत आहेत. यामुळे अलीकडच्या ट्रेडिंग सत्रांमध्ये सोन्याच्या किमतीवरील घसरणीचा दबाव वाढला आहे. (Gold Price Today)
शुद्ध सोने असे ओळखा?
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते. (Gold prices today)
हे ही वाचा :

