दहा वर्षांत २५ हजार ९३९ गोमंतकीयांनी सोडले भारताचे नागरिकत्वGoa Legislative Assembly
गोवा
दहा वर्षांत २५ हजार ९३९ गोमंतकीयांनी सोडले भारताचे नागरिकत्व; विधानसभेतून माहिती उघड
दहा वर्षांत २५ हजार ९३९ गोमंतकीयांनी सोडले भारताचे नागरिकत्व
पणजी : गोमंतकीयांकडून भारताचे नागरिकत्च सोडण्याचे प्रमाण वाढत आहे. २०१४ ते मार्च २०२४ या काळात तब्बल २५ हजार ९३९ गोमंतकीयांनी भारताचे नागरिकत्व सोडले असल्याची माहिती विधानसभेत विचारलेल्या प्रश्नावर लेखी उत्तरातून मिळाली आहे. गेल्या दहा महिन्यांत भारतीय नागरिकत्च सोडलेल्या गोमंतकीयांनी पोर्तुगाल व अन्य देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे.

