

शिवोली : पुढारी वृत्तसेवा; ओशेल येथे घरावर झाडे पडल्याने घरमालकांचे नुकसान झाले होते. त्यांना आमदार डिलायला लोबो यांच्याकडून आर्थिक मदत देण्यात आली.
दि. 7 रोजी रामतारीवाडा येथील तीन घरांवर झाडे पडली होती. यात घरांचे नुकसान झाले होते. बाबय चोडणकर, रवींद्र घाटवळ व जयंत चोडणकर यांना मदत देण्यातआली. यावेळी सरपंच वंदना नार्वेकर, उपसरपंच प्रवीण कोचरेकर, पंचायत सदस्य मंगेश चोडणकर, माजी पंचसदस्य गजानन नार्वेकर, विनय वायंगणकर उपस्थित होते. सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन लोबो यांनी दिले.