मडगाव : फोंड्यातील चोरीसाठी वापरलेली कार सापडली कोलवात

मडगाव : फोंड्यातील चोरीसाठी वापरलेली कार सापडली कोलवात
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा :फोंडा येथे दोन एटीएम मशिनसह लाखो रुपयांची रोकड पळविण्यासाठी चोरट्यांनी वापरलेली ओमनी कार शुक्रवारी (दि.19) कोलवा सर्कल परिसरातील एका निर्जन ठिकाणी रस्त्यावर सापडली. ही कार फोंडा येथून चोरीला गेल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. चार चोरट्यांनी एटीएम मशीन चोरल्यानंतर येथीलच पार्क केलेली कार चोरून त्यातून प्रवास केला होता.

चोरट्यांनी हे वाहन येथे आणून का सोडले, या सर्व गाष्टींचा पोलिस तपास करत आहेत. फातोर्डा पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात ही कार सकाळच्या वेळी आढळून आली. पोलिसांनी याची तपासणी केली आहे. शिवाय या चोरी प्रकरणी अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती आले असून लवकरच आम्ही हे प्रकरण सोडवू, असा विश्वास पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी व्यक्त केला.

वाचा ; 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news