

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्यात मोठ्या पावसाने उसंत घेतली असली तरी संततधार पाऊस सुरूच आहे. यामुळे राज्यातील एकूण 7 पैकी 3 धरणे शंभर टक्के भरली असून 2 धरणे भरण्याच्या पूर्णत्वाकडे आल्याची माहिती जलस्त्रोत खात्यातून मिळाली आहे.
साळवली, शापोली आणि गावणे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. तर पंचवाडी 99.9 व आमठाणे 98 टक्के भरले आहे. तिलारी धरण 82.5 तर अंजुणे धरण 66.1 टक्के भरले आहे. सध्या तिलारीमधून 114.76 क्यूसेक व साळवलीतून 1 क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
साळवली धरण क्षेत्रात एकूण 2229.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर शापोली क्षेत्रात 2006.30 ,तिलारी क्षेत्रात 1915. 30 , अंजुणे क्षेत्रात 1828 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
धरण एकूण क्षमता सध्याची क्षमता
( मीटर) ( मीटर)
तिळारी 113.20 108.18
साळावली 41.15 42.04
अंजुणे 93.20 86.55
आमठाणे 50.25 50.03
पंचवाडी 26 26.14
शापोली 38.75 38.75
गावणे 63.55 63.50