गोवा : सत्तरीत सहा उमेदवारांची निवड बिनविरोध?

गोवा : सत्तरीत सहा उमेदवारांची निवड बिनविरोध?
Published on
Updated on

वाळपई; पुढारी वृत्तसेवा :  सत्तरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शेवटच्या दिवशी 102 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यातील 6 उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. यात भिरोंडा पंचायतीतून उदयसिंग राणे, ठाणे पंचायतीमधील सरिता गावकर, सुभाष गावडे, म्हाऊस पंचायत सोमनाथ काळे, सावर्डे पंचायतीतून शिवाजी देसाई, पिसुर्ले पंचायत राजश्री जल्मी यांचा खास करून समावेश आहे.

मंगळवार उमेदवारांची अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर बुधवार उमेदवारी मागे घेण्यासाठी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडवून आणखी काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोमवारी दिवसभर उमेदवारी दाखल करण्यासाठी वाळपईच्या मामलेदार कार्यालयामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी मोठी रांग असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आज दाखल केलेल्या अर्जांमध्ये नगरगाव ग्रामपंचायत प्रभाग 1 चंद्रकांत रामा मानकर, प्रभाग 4 बाबलो वासु गावकर, प्रभाग 5 लक्ष्मी लक्ष्मण हरवलकर, नीता अनंत जोशी, प्रभाग 7 प्राप्ती प्रशांत सुरलकर. पर्ये पंचायत प्रभाग 2- रोहिणी रोहिदास गोसावी, भागीरथी भोलाराम गोसावी, प्रभाग 3- शाबलो पांडुरंग गुरव, प्रभाग 4- दीपा यशवंत नाईक, राधिका कृष्णा राणे. प्रभाग 7- निहाल बाबली शेट्ये, प्रभाग 8- लक्ष्मीकांत गुरुदास शिरोडकर.
सावर्डे पंचायत प्रभाग 1- अनिल गोविंद नेने, सचिन लक्ष्मण गावकर शिवा पांडुरंग कुडशेकर, प्रभाग 2 नितीन कुष्ठा गावकर, मंगेश पांडुरंग गावकर, सुशांत रामा गावकर, सत्यवान लक्ष्मण गावकर, निलेश बाळासाहेब राणे, अशोक पुंडलिक च्यारी. प्रभाग 5- अर्वी अर्जुन गावकर. प्रभाग 6 सुनीता सोनू डोईफोडे, सरिता विठू डोईफोडे, उज्वला अरुण नाईक. प्रभाग 7 यशोदा सत्यवान गावडे, प्राची राजाराम गावडे.
होंडा पंचायत : वार्ड 1- गजेंद्र आप्पाराव पाटील, वार्ड 2- अंजू सुभाष सिमेपुरषकर, वार्ड 3- प्रमोद फोंडू गावडे, दीपक गावकर
वार्ड 4- उर्मिला उत्तम माईंणकर महादेव जयदेव गावकर, वार्ड 6- प्रणाली उदय तामसे, वार्ड 7 कुश रामा वायंगणकर, भीमराव भाऊसाहेब राणे, 9- स्मिता मोटे रशमी वरक, 10 – लक्ष्मण बोडके विद्या विठा बोडके11- अस्मिता गणेश गावस, रेश्मा रघुनाथ गावकर.
खोतोडा पंचायत प्रभाग 1- रेवती बाबलो गावकर, पूर्णकला कृष्णा गावकर, 2- हिरा नारायण शिड्डेकर, 3-वसंत काशिनाथ चारी गजानन आत्माराम च्यारी, उन्नती गजानन चारी, 4- भालचंद्र दत्ता गावकर, प्रशांत तुकाराम गावकर, अमरीश नारायण गावकर, 6-प्रतिमा गोविंद पिर्णकर, 7-संतोष गोविंद गावकर, राजेश गोविंद गावकर.
भिरोंडा प्रभाग 1- भक्ती भानुदास गावडे, हेमा महादेव मादयकर, 2- दीपक महादेव वेरेकर, विरेश चंद्रकांत गावडे, बाबुराव दामू गावडे, 5- रिया रितेश गावडे, दिया दिलीप गावकर, 6 निधा अब्दुल रहमान शेख, 7- रंजना प्रीतेश राणे, रामा रवींद्र राणे.पिसुर्ले पंचायत प्रभाग 7- नामदेव बाबल च्यारी. केरी प्रभाग 1- आनंदी आनंद गावस, वैष्णवी विष्णू शेटकर, 4- शकुंतला लक्ष्मण गावस, 5- सीताराम नरेंद्र गावस, 6- व्यंकटराव ाणे सरदेसाई, 8- व्येंकटराव रामाराव राणे सरदेसाई. मोर्ले पंचायत प्रभाग 1 अनुपमा अशोक, 2- ज्ञानेश्वर हरिश्चंद्र केसरकर, 3- भाग्यश्री गावकर, 4- अमित गुरुदास शिरोडकर, पुष्पा गावकर, वार्ड 5 उर्मिला उदयसिंग राणे, मसो तानोडी.

गुळेलीत अटीतटीची लढतीची शक्यता
म्हाऊस पंचायत प्रभाग 3-कुंजल गावस, 6-सावित्री गावकर. गुळेली पंचायत प्रभाग 2- दक्षता गावकर, 3- कृष्णा नाईक, रेश्मा बुधो गावकर, 4 सूरज सुरेश नाईक, संतोषी नाईक, प्रभाग 7- ऋतुवा मेळेकर, द्रौपदी अर्जुन मळेकर यांनीही अर्ज दाखल केले. त्यामुळे गुळेलीत अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news