गोवा : राज्यात शनिवारी 158 नवे कोरोनाबाधित

गोवा : राज्यात शनिवारी 158 नवे कोरोनाबाधित

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात शनिवारी (दि. 13) दिडशेच्यावर नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात 1,199 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. जाहीर अहवालानुसार 158 नवे कोरोनाबाधित सापडले तर 144 कोरोनाबाधित बरे झाले.

त्यामुळे आजच्या दिवशी सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 947 झाली आहे. आजच्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नोंद नाही. राज्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे ज्यांनी कोरोना प्रतिबंधक डोस घेतले नाहीत, त्यांनी ते घ्यावेत असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news