गोवा : महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रंजीता पै

गोवा : महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रंजीता पै

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रंजीता पै यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाचे अध्यक्षपद मार्च 2022 पासून रिक्त होते. मडगाव येथील रंजीता या गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

आयोगाचे अध्यक्षपद वर्षभर रिक्त असल्याने विविध महिला संघटनांनी सरकारवर टीका केली होती.
महिलांना न्याय देण्यासाठी आयोगाच्या अध्यक्षपदी त्वरित नियुक्ती करण्याची मागणी महिला कार्यकर्त्यांनी केली होती. मागील महिन्यात बायलांचो साद संघटनेने अध्यक्ष नियुक्त करण्याबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल तसेच केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना पत्र लिहिले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news