गोवा : फोंड्याला उन्हाळ्यात सतावतेय पाणीटंचाई

गोवा : फोंड्याला उन्हाळ्यात सतावतेय पाणीटंचाई
Published on
Updated on

फोंडा; पुढारी वृत्तसेवा :  फोंडा तालुक्यातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी चारही मतदारसंघातील आमदारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ओपा जल प्रकल्पाबरोबरच म्हैसाळ धरणावरील पंचवाडी जल प्रकल्प आणि जायकाच्या पाण्यावर फोंडा तालुक्याची तहान भागवली जात आहे. उन्हाळ्यातील तीन महिने पाण्याची समस्या निर्माण होते. त्यावेळेला आवश्यक त्या ठिकाणी पाण्याचे टँकर्स पाठवले जातात.

फोंड्यातील ओपा जल प्रकल्पातून फोंड्यासह तिसवाडी तालुक्याला मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा केला जातो. रोज किमान 160 एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात असून पंचवाडीच्या धरणातूनही 10 एमएलडी पाणी पुरवले जाते. याशिवाय जायकाच्या योजनेंतर्गत बोरीतील झुआरी नदीतून काढलेल्या जलवाहिनीतूनही सुमारे पाच ते सहा एमएलडीचा पाणी साठा बोरीच्या काही भागाला उपलब्ध केला जात आहे. त्यामुळे सध्या तरी तालुक्याची तहान भागवली जात आहे; पण ऐन उन्हाळ्यात बर्‍याच ठिकाणी नळ कोरडे पडत असल्याने काही ठिकाणी लोकांना पाण्यासाठी फिरावे लागत आहे.

ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पात एकूण पाच युनिट असून गांजे प्रकल्पातूनही ओपाला शंभर एमएलडीचा साठा पुरवला जातो. केरी, सावईवेरे भागासाठी भूतखांब पठारावरही दोन नवीन टाक्यातून येथील लोकांना पाणी पुरवले जाते. भविष्यात खांडेपार नदीवर बंधारा बांधून प्रियोळसह कुर्टी भागातही पाणी पुरवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. तरीपण वाढती लोकसंख्या आणि वाढत्या शहरीकरणामुळे पाण्याचा साठा ऐन उन्हाळ्यात अपुरा पडतो.

मुर्डी-खांडेपार-सोनारबाग बंधार्‍याला विरोध

प्रियोळ मतदारसंघाबरोबरच कुर्टी भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी मुर्डी – खांडेपार-सोनारबाग बंधारा बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र मुर्डीबरोबरच सोनारबाग उसगावातील लोकांचा या बंधार्‍याला विरोध आहे. या बंधार्‍यामुळे पावसाळ्यात महापूर येण्याची भीती लोकांकडून व्यक्त होत आहे. राज्यात पुरेसा पाऊस पडत असल्याने आणखी बंधार्‍याची गरजच काय, असा प्रश्न केला जात आहे.

बंधारे ठरताहेत फायदेशीर…

राज्यात गतवर्षी पुरेसा पाऊस झाला. त्यामुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. ओपा जल प्रकल्पासाठी दूधसागर नदीवरील बंधार्‍यांतून पाण्याचा पुरवठा ऐन उन्हाळ्यात केला जातो. या बंधार्‍यांमुळे उन्हाळ्यात कमी होणार्‍या पाण्यावर चांगला उतारा मिळत असल्याने पाऊस सुरू होईपर्यंत हे पाणी पुरेसे ठरते, असे पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी सांगतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news