गोवा : पाच महिन्यांच्या चिमुरडीची हत्या

गोवा : पाच महिन्यांच्या चिमुरडीची हत्या
Published on
Updated on

हापसा/थिवी; पुढारी वृत्तसेवा :  दुसरीही मुलगीच झाल्यामुळे पाच महिन्यांच्या जिया नामक चिमुरडीची निर्घृण हत्या झाल्याचे रविवारी सकाळी उघड झाले. शिरसई येथील या घटनेने बार्देश तालुक्यासह राज्यभर हळहळ व्यक्‍त होत आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आई-वडीलच संशयीत असून त्यांना अटक केली आहे. आर्मीनदा डोरा फर्नांडिस (32, चापेल वाड्डो, शिरसई, बार्देश) आणि सुदिन गोंडलेकर (42) असे या दाम्पत्याचे नाव आहे. जिया हिची शनिवारी रात्री केव्हातरी हत्या केलेली आहे. या दाम्पत्याने जियाचा मृतदेह घेऊन रात्री 3.30 च्या सुमारास कोलवाळ पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी चिमुरडीला तातडीने उत्तर गोवा जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

मोठी मुलगी नातेवाईकांकडे
सुदिन गोंडलेकर पाडेली (नारळ काढण्याचे काम करणारे व्यावसायिक) आहेत. हे दाम्पत्य स्थानिकच आहे. ते मुळचे पेडणेतील आहेत. त्यांची पत्नी थिवी येथील आहे. दोघांचा आंतरजातीय प्रेमविवाह आहे. त्यांची पत्नी गृहिणी आहे. ते भाड्याच्या घरात राहतात. त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. घटनेच्या दिवशी म्हणजे शनिवारी ही मोठी मुलगी नातेवाईकांकडे पेडणे परिसरात होती. दोघांचेही कुटुंबिय कोलवाळ पोलिस ठाण्याच्या परिसरात उपस्थित होते.

आज शवचिकित्सा
जिया हिच्या मृतदेहाची चिकित्सा आज (15 ऑगस्ट) रोजी करणार आहेत. त्यानंतर हत्येच्या कारणांविषयी काही स्पष्टता होऊ शकते.

लाटण्याने मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिमुरडी जिया हिला आई-वडिलांनी लाटण्याने मारलेले आहे. त्यामुळे तिच्या शरीरावर विविध ठिकाणी जखमा आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news