गोवा : पर्वरीतील आरजी हॉस्पिटलमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांना गती

गोवा : पर्वरीतील आरजी हॉस्पिटलमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांना गती
Published on
Updated on

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  पर्वरी येथील आरजी हॉस्पिटल येथे रोबोटिक शस्त्रक्रियांना गती मिळत आहे. भारतातील रोबोटिक शस्त्रक्रियांचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन आरजी इस्पितळात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

रोबोटिक प्लॅटफॉर्म जसजसे दिवसेंदिवस वाढत आहे, तसेच दर्जेदार आरोग्यसेवेची मागणीही आव्हानात्मक होत आहे. त्यामुळे आरजी हॉस्पिटलमध्ये या सुविधा उपलब्ध केल्या गेल्या आहेत. आरजी हॉस्पिटल गोव्याने सीएमआर रोबोटिक सर्जरी सिस्टीम – अत्याधुनिक तंत्रज्ञान सुरू करून आणखी एक यशाचे शिखर गाठले आहे.

आरजी हॉस्पिटल्सचे सीनियर कन्सल्टंट, डॉ. वर्धन भोबे यांच्या म्हणण्यानुसार, सर्जनचे योग्य क्लिनिकल मूल्यांकन ठरवण्यासाठी लॅपरोस्कोपीवर रोबोटिक हस्तक्षेपाची गरज आहे. जेणेकरून सर्वोत्तम शस्त्रक्रिया परिणाम मिळू शकतील. रक्तसंक्रमणाची कमी गरज आणि संसर्गाचा कमी धोका असलेली रोबोटिक प्रणाली जगभरातील सर्वात क्लिष्ट युरोलॉजिकल शस्त्रक्रियांसाठी प्रगत उपाय आणते, अशी माहिती डॉ. वर्धन जोडले, डॉ. गुरप्रीत गिल (सल्लागार – युरोलॉजी, आरजी हॉस्पिटल) यांनी दिली आहे. अविनाश ओझा, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही याबाबत भाष्य केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news