गोवा : पणजीत दोन लाखांचे अमली पदार्थ जप्त

अमली पदार्थ
अमली पदार्थ
Published on
Updated on

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  अमली पदार्थविरोधी पथकाने कांपाल पणजी येथे टाकलेल्या छाप्यात एका व्यक्तीला अमली पदार्थासह अटक करण्यात आली.
एएनसी पथकाने छापा टाकला असता कांपाल येथे सनील नाईक (30) हा संशयास्पदरित्या सापडला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 12.50 ग्राम हिरोईन व 8.80 ग्राम एकस्टासे पावडर असे अमली पदार्थ सापडले. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात 2 लाख रुपये किंमत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news