गोवा : पणजी येथे काँग्रेसची निदर्शने

Congress
Congress
Published on
Updated on

पणजी; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना सक्तवसुली संचालनालय (इडी) ने गुरुवार, दि. 21 रोजी चौकशीसाठी बोलावल्याच्या निषेधार्थ देशभरात काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.

पणजी येथे गुरुवारी काँग्रेस कार्यालयाच्याखाली महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना बीना नाईक यांनी भारतीय जनता पक्षावर व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकार हुकूमशाही गाजवत असून फक्त काँग्रेस पक्ष केंद्र सरकारला जाब विचारत आहे. म्हणून केंद्र सरकार सूड भावनेने सोनिया गांधी यांची सतावणूक करत असल्याचा आरोप नाईक यांनी यावेळी केला. तसेच देशातील इतर पक्ष भाजपाची 'बी' टीम असल्याची टीकाही त्यांनी
केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news