गोवा निवडणूक : ‘आप’, कॉंग्रेसचाही बहुमताचा दावा

गोवा निवडणूक : ‘आप’, कॉंग्रेसचाही बहुमताचा दावा
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये भाजपने '22 प्लस' जागा निवडून येण्याचा दावा केला. यानंतर मंगळवारी आम आदमी पक्ष व काँग्रेसनेही पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीत बहुमताचा दावा केला आहे. मात्र या दाव्यामध्ये किती ठामपणा आहे हे 10 मार्चला लागणार्‍या (गोवा निवडणूक) निकालातूनच स्पष्ट होईल.

पत्रकार परिषदेत 'आप'चे गोवा संयोजक आणि म्हापसा मतदारसंघातील उमेदवार राहुल म्हांबरे म्हणाले की, राज्यात सोमवारी 40 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 78.94 टक्के मतदान झाले आहे. या निवडणूकीत आम आदमी पक्षाला बहुमत (गोवा निवडणूक) मिळणार असून, अमित पालेकर लवकरच गोव्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. सध्या सत्ताविरोधी मोठी लाट असल्याने गोवेकरांनी परिवर्तनासाठी मतदान केले आहे, असे ते म्हणाले.

'आप' गेल्या पाच वर्षांपासून गोवेकरांच्या विकासासाठी सक्रिय आहे. मला विश्वास आहे की, जनतेने आमच्या कामाची दखल घेत, 'आप'ला मतदान केले आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान लोकांनी आमच्यावर, आमच्या पक्षावर आणि आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, (गोवा निवडणूक) त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे म्हांबरे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत (गोवा निवडणूक)आदमी पक्ष व काँग्रेस नेत्यांनी खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, के. सी. वेणुगोपाल आणि इतर नेत्यांचे गोव्यातील प्रचार सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रभारी दिनेश गुंडू राव, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पराभूत होतील : चोडणकर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, राज्यातील लोकांनी स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी विश्वास दाखवला आहे. जवळपास 26 जागांसाठी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. गोवेकरांनी भाजपला हरवण्यासाठीच मतदान केले आहे. मी सर्व गोमंतकीयांचा आभारी आहे. भाजपला दहापेक्षा कमी जागा मिळतील. त्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पराभूत होतील, असा दावा चोडणकर यांनी केला.

'आप'च देऊ शकतो स्थिर सरकार : पालेकर

'आप'चे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अमित पालेकर म्हणाले की, या निवडणुकीतही अनेकांनी पैसा आणि 'मसल पॉवर'च्या जोरावर मतदारांवर प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. पण गोव्याच्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून गोवेकरांन बदलासाठी मत दिले आहे. याला कंटाळून लोकांनी परिवर्तनासाठी मतदान केले. लोकांनी 'आप'ला पाठिंबा दिला. 'आप' हा एकमेव पक्ष आहे जो स्थिर सरकार देऊ शकतो. 'आप' गोवा आणि तेथील लोकांसाठी लढत राहील.

नेते, कार्यकर्ते सुशेगादऽऽऽ

तिनेक महिन्यांची राजकीय धावपळ, महिनाभराची प्रचाराची दगदग, मतदानाच्या दिवशी सोमवारी अनुभवलेला ताण यापासून मंगळवारी राजकीय नेत्यांनी दूर जाणेच पसंत केले. मुख्यमंत्री दिवसभराच्या सुटीसाठी सोमवारी रात्रीच पत्नी व मुलीसह राज्यातच अज्ञातस्थळी निघून गेले, तर विरोधी पक्षनेते मंगळवारी रात्री चार दिवसांच्या सुटीसाठी राज्यातील एका निवांत ठिकाणी जाण्यास निघाले आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news