गोवा : ‘गोवा काजू’ नावाखाली ग्राहकांची फसवणूक

गोवा  :  ‘गोवा काजू’ नावाखाली ग्राहकांची फसवणूक

मडगाव;  रविना कुरतरकर :  दिवाळी जवळ आल्याने सुक्या मेव्याची मागणी वाढू लागली आहे. त्यानुसार बाजारात अवाक वाढली आहे. पर्यटक हंगाम सुरू झाल्याने सुक्या मेव्याला विशेषतः गोव्यातील काजूगरांना मोठी मागणी आहे; परंतु दर्जेदार गोवा काजू असे सांगून परराज्यातून आयात केले जाणारे काजूगर विकले जात आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'गोवा काजू' असे नाव वापरून दुय्यम दर्जाचा काजू ग्राहकांची माथी मारण्याचा प्रकार अनेक विक्रेत्यांनी सुरू केला आहे.

गोव्यातील सर्वात प्रचलित सुक्या मेव्यांपैकी काजू हा सर्वांचा आवडता प्रकार आहे. गोव्यातील बागायतीमध्ये उत्पादित होणार्‍या काजूची चव वेगळी असते. असा काजूगर इतर ठिकाणी मिळत नाही. काजूचे सुमारे 22 प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकार मागणीत असतात. सालासहित काजू (टरफल असलेला) 1 हजार 100 ते 1 हजार 200 रुपये प्रतिकिलो दरात विकला जात आहे. टरफल काढलेले काजू 1 हजार 300 ते 1 हजार 400 या दरात दरात विकला जात आहे; मात्र काही व्यापारी अधिक पैसा कमविण्याच्या हेतून पर्यटकांची लूट करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. परराज्यातील किंवा अन्य देशातील हा कमी दर्जाचा काजू आयात करून तो 'गोवा काजू' या नावाने राज्यातील बाजारात विकत आहे.

या प्रकारामुळे गोमंतकीयांसह पर्यटकांचीही फसवणूक होत आहे. गोमंतकीय काजूचे उत्पन्न अन्य कोणत्याही राज्यात होणे शक्य नाही. त्यामुळे गोमंतकीय काजूला मोठी मागणी असते. त्याचा गैरफायदा घेत बेकायदेशीरपणे विक्री करणारे व्यापारी ग्राहकांना कमी दरात काजू देण्याच्या हेतूने परराज्यातून कमी दर्जाचे काजू आयात करतात. या काजूचे गोवा काजू या नावाखाली पॅकिंग केले जाते. हा प्रकार आता दक्षिण व उत्तर गोव्यातही सुरू असून, किनारी भागात त्याची व्याप्ती मोठी आहे.

याबाबत काजूचे व्यापारी सुदीप शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीजवळ येताच सुक्या मेव्याला मागणी वाढते. कोरोना काळात ही मागणी फार कमी झाली होती. यामुळे काजू उत्पादकांना व व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागला होता. दोन वर्षांनंतर आता स्थिती बदलली आहे. पण, इंधनाच्या किमती वाढल्याने दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. हे दर दिवाळीपर्यंत स्थिर असले, असेही शिरोडकर यांनी सांगितले.

संबंधित यंत्रणेने कारवाई करावी :  वेळीप

आदर्श कृषी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी सांगितले, की राज्यात काही व्यापारी बेकायदेशीरीत्या स्वस्त दरात काजू विक्री करण्यासाठी निकृष्ठ दर्जाचे काजू बाजारात आणत आहेत. या काजू पाकिटांवर गोवा काजू असे नाव टाकल्याने ग्राहकांची फसवणूक होते. संबंधित यंत्रणेने या प्रकराची गंभीर दखल घ्यावी. विक्रेत्यांची नोंदणी केली जाणार आहे. काजू विक्रीचा व्यवसाय करणार्‍यांना प्रत्येक काजू पाकिटांवर, कोणत्या राज्यातील काजू, कोणत्या प्रकारचा काजू व काजूवर कुठे प्रक्रिया करण्यात आली आहे. या सर्व प्रकारची माहिती नमूद करण्याची सक्ती करावी. तसा कायदा लागू होणार आहे. गोमंतकीय काजू हा अव्वल दर्जाचा असल्याने हा स्वस्त किमतीत विकला जाणे शक्य नाही.

तीन वर्षांतील सुक्या मेव्याचे दर रु. प्रतिकिलो

2020

प्रकार         दर
श्रजर्दाळू  :  900
श्रअक्रोड  :  1 हजार 400
श्रमनुका   :  400
श्रपिस्ता    :  1 हजार 100
श्रकाजू     :  900
श्रबदाम    :  1 हजार 400
श्रखजूर    :  300

2021

प्रकार               दर
श्रजर्दाळू ः   600 ते 700
श्रअक्रोड ः   1 हजार 200
श्रमनुका ः       340
श्रपिस्ता ः     1 हजार 100
श्रकाजू ः       800 ते 1 हजार 300
श्रबदाम ः      1 हजार 100 ते 1 हजार 300
श्रखजूर ः          340

2022

प्रकार              दर
श्रजर्दाळू ः     750
श्रअक्रोड ः   1 हजार
श्रमनुका ः   300 ते 340
श्रपिस्ता ः    1 हजार ते 1 हजार 200
श्रकाजू ः     1 हजार 200 ते 1 हजार 400
श्रबदाम ः    1 हजार 200 ते 1 हजार 300
श्रखजूर ः       340 ते 360

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news