गोवा : काँग्रेसच्या निदर्शनात एकमेव आमदार

गोवा : काँग्रेसच्या निदर्शनात एकमेव आमदार

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना सत्तवसुली संचालनालयने (इडी) पुन्हा समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आल्याच्या निषेधार्थ गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे मंगळवारी (दि. 26) निदर्शने केली.

जुने गोवे येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आयोजित या आंदोलनाकडे काँग्रेसच्या 11 पैकी 10 आमदारांनी पाठ फिरवली. शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो या एकमेव आमदार या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या होत्या.

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली. या निदर्शनाला कुंभारजुवेचे स्थानिक काँग्रेस आमदार राजेश फळदेसाई हेही फिरकले नाही. यावेळी लोबो यांनी सांगितले, की 2015 साली बंद झालेली भ्रष्टाचाराचे प्रकरण पुन्हा उघडून भाजपने सोनिया गांधी यांना त्रास देणे सुरू केले आहे. काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव आणण्यासाठी इडीचा वापर केंद्रीय भाजप सरकार करत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला. युवा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news