गोवा : कदंब स्थानके ठरताहेत पांढरे हत्ती

गोवा : कदंब स्थानके ठरताहेत पांढरे हत्ती
Published on
Updated on

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  सरकारने करोडो रुपये खर्च करून पाच सहा वर्षांपूर्वी बांधलेली होेंडा, शिरोडा व कुंकळ्ळी येथील कदंबची बसस्थानके म्हणजे पांढरा हत्ती ठरली आहेत. या बसस्थानकावर पाच वर्षे झाली बसेस जात नाहीत. त्या बसस्थानकाचा योग्य वापर होत नाही. त्यामुळे त्यांच्यावर खर्च केलेले करोडो रुपये वाया गेले आहेत, अशी माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी आज विधानसभेत दिली.

केपेचे आमदार एल्टॉन डिकोस्टा यांनी केपे येथे माजी आमदाराने मतासाठी निविदा न काढताच बसस्थानकाची पायाभरणी केली. ते बसस्थानक बांधणार की नाही असा प्रश्न उपस्थित करून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली असता गुदिन्हो यांनी वरील उत्तर दिले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चर्चेत हस्तक्षेप करताना सांगितले की, आमोणा पुलाची पायाभरणी चार वेळा झाली होती. शेवटी आपल्या कारकिर्दीत ते बांधले गेले. केपे बसस्थानकांची निविदा काढली होती, फक्त कामाचे आदेश दिले नव्हते. कारण त्या बसस्थानकांची जागा रस्त्यापासून बरीच दूर आहे, असे सांगून करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या तीन बसस्थानकावर बसेस जात नाहीत हा प्रकार गोव्यातच असावा असेही ते म्हणाले. गरज त्या ठिकाणी योग्य जागी बसस्थानके बांधली जातील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बसस्थानकावरील सभागृह 20 दिवस वापर
बसस्थानकाशी संलग्न सभागृह बांधण्याची योजना केपेत होती. यापूर्वी अस्नोडा व वाळपईत बसस्थानकाशी संलग्न सभागृह बांधलेत. पण, त्याचा फायदा होत नाही. देखरेखीवर पैस खर्च होतात. वर्षातून फक्त 20 ते 22 दिवस त्याचा वापर होतो. त्यामुळे बसस्थानकाशी संलग्न सभागृहे बांधताना यापुढे योग्य तो विचार होणार असल्याचे गुदिन्हो यांनी यावेळी सांगितले.

पणजी, वास्को बसस्थानकांना प्राधान्य
पणजी हे राजधानीचे शहर आहे. तेथील बसस्थानकाची दुरुस्ती व काही भाग नव्याने बांधण्याची तयारी वाहतूक खात्याने केली आहे. वास्कोचे अपूर्ण बसस्थानकही पूर्ण करायचे आहे. त्यानंतर केपेच्या बसस्थानकाचा विचार होऊ शकतो. कारण सरकारला उगाच प्रकल्प उभारून ते पांढरे हत्ती करायचे नाही, असेही गदिन्हो यांनी यावेळी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news