किर्गिस्तानचे पहिले चार्टर विमान उद्या गोव्यात उतरणार

किर्गिस्तानचे पहिले चार्टर विमान उद्या गोव्यात उतरणार

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पर्यटन हंगाम जोमाने सुरू झाला आहे. नववर्ष साजरे करण्यासाठी देशी पर्यटक मोठ्या संख्येने राज्यात येत आहेत. यातच किर्गिस्तान देशातील पहिले चार्टर विमान 29 डिसेंबर रोजी गोव्यात येणार आहे. हे विमान दाबोळी विमानतळावर उतरणार आहे.

एअरो नोमाड कंपनीचे हे विमान जानेवारी अखेरपर्यंत आठवड्यातून एकदा येणार आहे. पर्यटकांना गोव्यातील आदरातिथ्य, पर्यटन स्थळे आवडली; तर ही सेवा मार्च अखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. पहिल्या विमानातून सुमारे 170 पर्यटक राज्यात येणार आहेत. सध्या राज्यात रशिया आणि ब्रिटनमधून सर्वाधिक चार्टर उड्डाणे येतात. मोप विमानतळ सुरू झाल्यावर चार्टर विमाने तेथेच उतरण्याची शक्यता आहे. या हंगामातील पहिले चार्टर विमान 26 ऑक्टोबर रोजी आले होते. काझाकस्थान येथील या विमानातून 189 प्रवासी आले होते.

दाबोळीवर 89 विमाने

मंगळवारी दाबोळी विमानतळावर 89 विमाने उतरली तर तेवढ्याच विमानांनी उड्डाणे घेतली. यामध्ये पाच आंतरराष्ट्रीय विमानांचा समावेश होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news