

पणजी : प्रसिद्ध अभिनेते, डान्सर, चित्रपट निर्माते आणि राजकीय नेते चिरंजीवी यांना 53 व्या इफ्फी सोहळ्यात इंडियन फिल्म पर्सनॅलिटी 2022 या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तेलगू फिल्म इंडस्ट्रीसह हिंदी, कन्नड आणि तामिळ चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाचा अमीट ठसा त्यांनी उमटवला आहे. आतापर्यंत चिरंजीवी यांना देशाच्या मानाचा पद्मभूषण आणि आणि आंध्र प्रदेशातील रघुपती व्यंकय्या या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
चिरंजीवी यांनी 1978 मध्ये पुनाधीरालू या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले नसून त्यांनी देशाच्या आघाडीच्या नायकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. मेगास्टार म्हणून त्यांना ओळखले जाते. ते सामाजिक कार्यातही नेहमीच अग्रेसर असताता. त्यांनी 1998 मध्ये चिरंजीवी चॅरिटेबल फाऊंडेशनची स्थापना केली आहे.
५३व्या इफ्फी चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी अनेक कलाकार गोव्यात पोहोचले आहेत. यामध्ये सारा अली खान, कार्तिक आर्यन, वरुण धवन, परेश रावल आणि सुनील शेट्टी या नावांचा समावेश आहे. त्याचबरोबर अनेक कलाकारांनीही यावेळी लाईव्ह परफॉर्मन्स देखील दिले आहेत. अनेक कलाकार गोव्यात या चित्रपट महोत्सवाला तर हजेरी लावतच आहेत. पण, याच महोत्सवाचे निमित्त साधून कलाकार गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर धमाल करताना दिसत आहेत.