Sattari Wildlife | सत्तारी तालुक्यात रानटी प्राण्यांचा आणि माकडांचा उपद्रव थेट घरापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sattari Wildlife | माकडांचा वाढता त्रास : शेतकरी, नागरिक त्रस्त; ठोस उपाययोजनांची मागणी
Naigaon Monkey Attack
Naigaon Monkey Attackfile photo
Published on: 
Updated on: 

वाळपई : पुढारी वृत्तसेवा
सत्तारी तालुक्यात रानटी प्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, हा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या बागायतींपुरता मर्यादित राहिलेला नाही. माकडांचे समूह थेट घरांमध्ये घुसून खाद्यपदार्थ व वस्तू पळवून नेत असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या जवळपास दहा वर्षांपासून या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत असली, तरी अद्याप प्रभावी तोडगा निघालेला नाही.

Naigaon Monkey Attack
Pernem Crime News | पेडणे तालुक्यात खळबळ; शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेची टोकाची भूमिका

सत्तारी तालुका घनदाट जंगल आणि जैवविभिधतेसाठी ओळखला जातो. मात्र, माकड, गवे, रानडुक्कर, शेकरू आणि मोर यांसरह विविध वन्यप्राण्यांचा मानवी वस्त्यांमधील वावर वाढला आहे. काजू, नारळ, सुपारी, आंबा, केळी, मिरी आणि भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

माकडांकडून नारळ व फळांचे नुकसान, तर रानडुक्कर आणि गव्यांकडून भातशेतीची नासधूस होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. पिकांच्या संरक्षणसाठी रात्रंदिवस पहारा देऊनही नुकसान होत असल्याने काही शेतकऱ्यांनी भातशेतीकडे पाठ ফিরवली आहे.
माकडे घरांमध्ये घुसून खाद्यपदार्थ, फळे आणि इतर वस्तू पळवून नेत आहेत.

Naigaon Monkey Attack
Goa Valpoi | वाळपईत नळाच्या पाण्यामध्ये आढळले किडे

त्यामुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. साठरे, दरवडे, कोदाळ, हिवरे, चरावणे, शेळ-मेळावली आणि म्हाळे या भागांत उपद्रव अधिक असल्याच्या तक्रारी आहेत.

वनमंत्री राणे यांनी लक्ष द्यावे

वनमंत्री विश्वजित राणे यांनी या प्रश्नाकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच पर्येच्या आमदार डॉ. देवीया राणे यांनी स्थानिक समस्या सरकारसमोर मांडून उपाययोजनांसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. वनखाते आणि कृषी खात्याने समन्वयाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा सत्तारीतील शेतकरी व नागरिक व्यक्त करत आहेत.

वनप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची सर्वेक्षण, वेळेत भरपाई आणि माकडांच्या उपद्रवावर वैज्ञानिक व कायदेशीर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. वन्यजीवांचे संरक्षण करतानाच नागरिकांची सुरक्षितता आणि शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी सरकारने स्वतंत्र धोरण जाहीर करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.