GOA CARNIVAL : कार्निव्हल उद्घाटनाला बॉलिवूडमधील तारे उपस्थित राहणार

पणजी : महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना आयुक्‍त आग्नेलो फर्नांडिस. बाजूला इतर.
पणजी : महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना आयुक्‍त आग्नेलो फर्नांडिस. बाजूला इतर.
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राजधानीत दि. 26 पासून कार्निव्हलचा (GOA CARNIVAL) जल्लोष रंगणार आहे. दि. 1 मार्चपर्यत राज्यातील विविध भागात कार्निव्हलचा उत्साह अनुभवता येणार आहे. शनिवारी उद्घाटनाला (दि. 26) बॉलिवूडमधील तार्‍यांची उपस्थिती असेल. त्याबाबत चर्चा सुरू असून निश्‍चित झाल्यानंतर नाव जाहीर केले जाईल, अशी माहिती पणजी महापालिकाचे आयुक्‍त आग्नेलो फर्नांडिस यांनी दिली.

विविध औद्योगिक भागधारक, नागरिक आणि समूह नेतृत्वासोबत मनपा विविध कार्यक्रम सादर करणार आहे. शनिवारी दु. 3 वा. सुरू होणार्‍या मिरवणुकीत विविध पारंपरिक समूह, संस्था, नागरिक, टाकाऊपासून टिकाऊ कलाकृती व विदूषक यांचा (GOA CARNIVAL) समावेश असणार आहे. शहरातील गार्सिया दी ओर्टा उद्यान चार दिवसांसाठी सांबा स्क्वेअरमध्ये रूपांतरित होणार आहे. जेणेकरून लोक एकत्र येऊन खर्‍या सांबा शैलीत उत्सव साजरा करू शकतील.

मिरामार समुद्रकिनार्‍याजवळील नूतनीकृत पदपथ आणि शहराभोवतीची इतर ठिकाणे जोडली जाईल. शहरात सायकल सहल आणि चालण्याचे उपक्रम (GOA CARNIVAL) आयोजित केले जाणार आहेत. कार्निव्हलच्या सर्व स्थळांवर विविध वयोगटातील कलाकार आपले कलाविष्कार सादर करणार आहेत. स्थानिक कलाकार, बॅण्ड, स्टॅण्ड अप कॉमेडी कलाकार, नर्तक, नर्तिका आपल्या कला सादर करणार आहेत. सांबा स्क्वेअरवर सर्व वयोगटातील मुलांसाठी कला कार्यशाळा, हस्तकला सत्रे, सर्जनशील खेळ होतील. भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठीही एक क्षेत्र राखीव ठेवले आहे. इथे भटक्या कुत्र्यांना दत्तक घेता येऊ शकते.

स्थानिक हॉटेल, रेस्टारंटस व छोट्यामोठ्या खाद्य दुकानांमधील पदार्थांची चव कार्निव्हलमध्ये एकाच ठिकाणी चाखता येईल. विविध अन्न व पेय व्यावसायिक एकत्र आले आहेत. 'ताज'तर्फे फूड ट्रकही आणला जाणार आहे. ज्यातील पदार्थ ताजच्या नेहमीच्या किमतीच्या केवळ 10% दराने विकले जाईल. सांबा स्क्वेअर इथे ही खाऊगल्ली असेल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. छोट्यामोठ्या खाद्य दुकानांमधील पदार्थांची चव कार्निव्हलमध्ये एकाच ठिकाणी चाखता येईल. विविध अन्न व पेय व्यावसायिक एकत्र आले आहेत. 'ताज'तर्फे फूड ट्रकही आणला जाणार आहे. ज्यातील पदार्थ ताजच्या नेहमीच्या किमतीच्या केवळ 10% दराने विकले जाईल. सांबा स्क्वेअर इथे ही खाऊगल्ली असेल, (GOA CARNIVAL)  अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत महापालिका अभियंता विवेक पार्सेकर, 'ताज' हॉटेल समूहाचे प्रक्षेत्र व्यवस्थापक विन्सेट रामोज, उद्योजक मॅकनिज परेरा, हॉटेल व्यावसायिक प्रल्हाद सुकथनकर, प्रदीप नाईक, रिचर्ड डायस आदी उपस्थित होते.

पर्यटन विभागाकडून 20 लाख रुपये

कार्निव्हलसाठी राज्याच्या पर्यटन (GOA CARNIVAL) विभागाकडून 20 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. उर्वरित रक्‍कम ही विविध प्रकारच्या प्रयोजकांकडून घेतली जाणार आहे. 'ताज' हॉटेल समूहाकडून व्यावसायिक, सामाजिक जबाबदारी उपक्रमाद्वारे प्रायोजकत्व दिले जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news