

केरी : साखळी शहरातील दत्तवाडी-विठ्ठलापूरला जोडणाऱ्या वाळवंटी नदीवरील मुख्य पुलावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने पुलाला अक्षरशः तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. निचऱ्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यामुळे पावसाचे पाणी पुलावरच साचून राहत असून, भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे चिखलमिश्रित पाण्याचे फवारे पादचारी व दुचाकीस्वारांच्या अंगावर उडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
हा पूल जुना असल्याने येथे वाहतुकीचा ताण आधीच मोठा असतो. त्यातच पुलावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी असलेली छिद्रे माती, गाळ व कचऱ्याने बुजल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जात नाही. परिणामी प्रत्येक पावसानंतर पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, वाहनचालकांना अंदाज न आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तो सपाट नाही.
विशेषतः सकाळी व सायंकाळी शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांच्या वेळेत या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. अशा वेळी पादचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. स्वतंत्र पदपथ नसल्याने पादचाऱ्यांना लागते. भरधाव वाहनांमुळे उडणाऱ्या वाहनांच्या अगदी जवळून चालावे चिखलमिश्रित पाण्यामुळे त्यांच्या कपड्यांचे नुकसान तर होतेच, शिवाय अपघाताचा धोका देखील निर्माण होतो. पुलावरील साचलेल्या पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच पाण्यामुळे पुलाच्या पृष्ठभागाची झीज अधिक वेगाने होत असल्याने भविष्यात या पुलाच्या
'अधिका-यांच्या डोळ्यांवर पट्टी' या मार्गावरून दररोज सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, इतर सरकारी विभागांचे अधिकारी ये-जा करतात. मात्र पुलावरील ही गंभीर समस्या त्यांच्या निदर्शनास येऊनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली. निचऱ्याची छिद्रे स्वच्छ करण्यात आलेली नाहीत, याबद्दलही नागरिकांनी संताप व्यक्त केला.