Jagdeep Dhankhar Goa Visit | उपराष्ट्रपती जगदीप धनखड तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; विविध संस्थांना भेटी, कार्यक्रमांचे आयोजन

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे तीन दिवसांच्या गोवा दौर्‍यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत.
Vice President Jagdeep Dhankhar in Goa
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे स्वागत करताना राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आदी. (Pudhari Photo)
Published on
Updated on

Vice President Jagdeep Dhankhar in Goa Institutional Visits

पणजी : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे तीन दिवसांच्या गोवा दौर्‍यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. दाबोळी विमानतळावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, राज्य शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो, खासदार सदानंद शेट तानावडे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

या दौर्‍यात ते गोव्यातील प्रसिद्ध मुरगाव बंदर प्राधिकरणाला भेट देणार असून विविध नव्या प्रकल्पांचे उद्घाटन करून ते राष्ट्राला समर्पित करणार आहेत. याशिवाय, ते गोवा स्थित केंद्रीय किनारी शेती संशोधन केंद्र या संस्थेला भेट देऊन तेथील वैज्ञानिक व प्राध्यापकांशी संवाद साधणार आहेत. गुरूवारी (दि. २२) त्यांच्या हस्ते राजभवनावर उभारण्यात आलेल्या महर्षी सुश्रुत आणि महर्षी चरक यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

Vice President Jagdeep Dhankhar in Goa
Goa Panchayat Bypoll | गोवा पंचायत पोटनिवडणूक : अस्नोडातून मीता नाईक; थीवीतून नीरज नागवेकर विजयी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news