

Goa Panchayat Election Results
पणजी : बार्देश तालुक्यातील अस्नोडा व थिवी या पंचायतीच्या रिक्त असलेल्या प्रत्येकी एक प्रभागासाठी रविवारी (दि. ११) निवडणूक झाली. या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज (दि.१२) झाली. या निवडणुकीमध्ये अस्नोडा पंचायतीच्या प्रभाग ७ मधून मीता मिलेश नाईक या तब्बल ५२.६८ टक्के मते घेऊन निवडून आल्या. या प्रभागांमध्ये एकूण तीन उमेदवार होते. दुसऱ्या क्रमांकाची ७९ मते (२६.५१ टक्के ) माजी पंच शंकर पांडुरंग नाईक यांना मिळाली.
तर तिसऱ्या क्रमांकाची ५९ मते (१९.१८ टक्के ) विजय बाबय बाणावलीकर यांना मिळाली. मिलेश नाईक यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी पोटनिवडणुकीत उभ्या राहिल्या व निवडून आल्या.
थीवी पंचायतीच्या प्रभाग १ साठी झालेल्या निवडणुकीत नीरज नारायण नागवेकर हे ३३४ मते (४१.५४ टक्के ) घेऊन विजयी झाले. तर रवींद्र शिवा आरोसकर यांना २४४ मते (२७.८६ टक्के ) मिळाली. तिसऱ्या क्रमांकाची १५२ मते (१८.९१ टक्के ) घनश्याम पुंडलिक आरोसकर यांना मिळाली . तर रामचंद्र चंद्रकांत साळगावकर यांना ८९ मते ( ११.०७ टक्के) मिळाली. थीवीच्या प्रभाग एक मध्ये चार उमेदवार मैदानात उतरले होते.