E20 Petrol Issues | ई-20 इंधनामुळे वाहनचालक त्रस्त

E20 Petrol Issues | राजेश गावकर यांचा संवाद ; ग्राहकांना निवडीचा अधिकार द्यावा
E20 Petrol Consumer Court
E20 Petrol Consumer CourtPudhari
Published on
Updated on

काणकोण : पुढारी वृत्तसेवा

सक्तीने लागू केलेल्या ई-२० इंधनामुळे वाहनधारकांना विविध समस्या भेडसावत असल्याची तक्रार काणकोणातील वाहनचालकांनी आपल्या एसटी विंगचे अध्यक्ष राजेश गावकर यांच्याकडे केली. ई-२० आणि शुद्ध पेट्रोल या दोन्ही पर्यांपैकी निवडीचा अधिकार ग्राहकांना देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

E20 Petrol Consumer Court
Mumbai- Goa Highway | "मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे पडण्यास प्रारंभ! पणदूर अन् वेताळबांबर्डेतील खड्डा ठरतोय जीवघेणा"

राजेश गावकर यांनी काणकोणात वाहनचालकांशी संवाद साधला. यावेळी अनेक वाहनधारकांनी ई-२० इंधनामुळे वाहनांचे मायलेज कमी झाल्याची, इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याची तसेच दुरुस्तीचा खर्च वाढल्याची तक्रार केली. काही वाहनचालकांनी नाराजी व्यक्त करत सरकारने वाहनधारकांना पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. यावेळी गावकर म्हणाले, वाहनधारकांना शुद्ध पेट्रोल आणि ई-२० या दोन्ही प्रकारच्या इंधनांपैकी निवडीचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.

E20 Petrol Consumer Court
Goa Charter Tourism Season | चार्टर पर्यटन हंगामासाठी गोवा सज्ज

दरम्यान, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत १ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय ऑनलाइन टाऊनहॉलमध्ये सहभागी होण्याची इच्छाही अनेक वाहनचालकांनी व्यक्त केली. यात सहभागी होण्यासाठी पक्षाच्या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधून कार्यक्रमाची लिंक मिळवता येणार असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news