Goa News|नुकसानग्रस्तांना सरकारकडून सर्वतोपरी मदत

आमदार कृष्णा साळकर : व्यावसायिकांनी श्री दामोदरला केले श्रीफळ अर्पण
Goa
वास्को : मॉडर्न मार्केटच्या दुकानदारांनी वास्कोचे ग्रामदैवत दामोदराचे दर्शन घेतले.
Published on: 
Updated on: 

MLA Krishna Salkar Assures Government Aid To Vasco Traders

दाबोळी : मुरगाव पालिकेच्या मॉडर्न मार्केटमधील नुकसानग्रस्त दुकानदारांना त्याच ठिकाणी जागा उपलब्ध करण्यासाठी सरकार पुढाकार घेणार आहे. गुरुवार १ नोव्हेंबरपर्यंत त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय मॉडर्न मार्केटच्या व्यवसायिकांनी घेतला आहे. सरकार मॉडर्न मार्केटमधील सर्व व्यवसायिकांना सर्व ती मदत करणार, असे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले.

बुधवारी रात्री लागलेल्या आगीत मॉडर्न मार्केट पूर्णपणे उद्धवस्त झाले. पण दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही. यासाठी मॉर्डन मार्केटच्या सर्व व्यावसायिकांनी येथील ग्रामदैवत दामोदर देवाचे दर्शन घेऊन 'श्रीफळ' अर्पण केला.

वास्कोत बुधवारी मुरगाव पालिका क्षेत्रात तीन ठिकाणी आग लागून मोठ्या प्रमाणात हानी झाली. यात मुरगाव आपत्कालीन व्यवस्थापन समिती काही प्रमाणात कमी पडल्याची माहिती मॉडर्न मार्केट संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. अग्निशमन दलाला काही सामान वाचविता आले असते; पण त्यांच्याकडून आम्हाला पाहिजे तसे सहकार्य लाभले नसल्याची खंत संघटनेचे सचिव दयाराम केवड यांनी व्यक्त दिली. आता आम्हाला यातून फक्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आमदार कृष्णा साळकर सहकार्य करावे, अशी आशा मॉडर्न मार्केट संघटनेने व्यक्त केली आहे.

बुधवारी रात्री लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यासाठी मॉर्डन मार्केट संघटनेच्या पदाधिकारी व व्यावसायिकांनी देव दामोदराचे दर्शन घेऊन 'श्री' चरणी श्रीफळ अर्पण केला. शुक्रवार (दि.३०) रोजी मॉर्डन मार्केट संघटनेसोबत आमदार साळकर यांनी बोलणी करून सर्व व्यावसायिकांना त्वरीत मॉर्डन मार्केटमध्ये पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार, असे सांगितले.

तसेच नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी राज्य नगरविकास संस्था (सुडा) अंतर्गत मॉर्डन मार्केटचे काम हाती घेणार, असे आमदार साळकर यांना सांगितले आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी घाबरण्याचे अजिबात कारण नसून व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार, असे साळकर यांनी सांगितले.

Goa
Goa Niwas Delhi Authentic Goan Food |दिल्लीतील गोवा निवासमध्ये अस्सल गोवन जेवण देणार

शुक्रवारी सुद्धा पालिकेच्या मॉडर्न मार्केटमध्ये आग लागण्याचे सत्र सुरूच होते. सकाळ ते दुपार पर्यंत दोन अग्निशमन दलाच्या वाहनाने आगीवर नियंत्रण ठेवण्यास यश मिळविले. दरम्यान, पालिकेच्या पूर्ण मॉर्डन मार्केट परिसरात भारतीय न्याय संहिता १६३ कलम अंतर्गत कोणालाही आत जाण्यास बंदी घातली आहे. तसेच मुरगावचे पोलिस अधीक्षक गुरुदास कदम यांच्या नेतृत्वाखाली वास्को पोलिस निरीक्षक वैभव नाईक देखरेख करत आहे.

Goa
Goa|नुकसानग्रस्तांना नवीन दुकाने बांधून देणार

विरोधी पक्ष नेत्यांना रोखणे एकदम चुकीचे: डिसोझा

गुरुवारी मॉर्डन मार्केटमध्ये आग लागलेल्या ठिकाणी जाण्यास विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना रोखणे एकदम चुकीचे असून, सरकारने विरोधी पक्षाला गृहीत धरू नये, असा सल्ला डिसोझा यांनी दिला. मॉर्डन मार्केट पुन्हा उभारून देताना स्थानिक व्यावसायिकांना विश्वासात घेण्याची मागणी माजी जुझे फिलीप डिसोझा यांनी केली आहे.

प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी : राऊत

माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी मॉर्डन मार्केटमधील नुकसान झालेल्या व्यवसायिकांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. आग नैसर्गिकरित्या लागली की कोणी मुद्दामहून लावली याची चौकशी राज्य गृह विभागाने करणे आवश्यक आहे. भाजप सरकार एकतर्फी विचार करणारा पक्ष असल्याने सुडबुद्धिचे राजकारण करत असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.