Vasco News | छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पोलीस बंदोबस्त

Vasco News | न्यायालयाच्या आदेशानंतर सदा येथील पुतळ्या भोवती बॅरिकेड्स उभारले
Vasco News | छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पोलीस बंदोबस्त
Published on
Updated on

वास्को : पुढारी वृत्तसेवा

मुरगाव सदा येथे मुरगाव पत्तन प्राधिकरणाच्या (एमपीए) हद्दीत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी बॅरिकेड्स उभारले असून, तेथे चोवीस तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Vasco News | छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पोलीस बंदोबस्त
Goa Statue Controversy | मुरगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जुलैच्या अखेरीस हटवण्याची तयारी

उच्च न्यायालयाने पुतळा सन्मानपूर्वक हटविण्याचे आदेश दिल्यानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. सदा येथील मुख्य बसस्थानकाजवळ फेब्रुवारी २०२६ मध्ये स्थानिक शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. मात्र, हा पुतळा एमपीएच्या मालकीच्या जागेत त्यांची पूर्वपरवानगी न घेता उभारण्यात आल्याचा आक्षेप एमपीएने घेतला होता.

एमपीएने मुरगावचे उपजिल्हाधिकारी, मुरगाव पालिका, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, मुरगाव पोलीस ठाणे, पोलीस उपअधीक्षक कार्यालय तसेच संबंधित विभागांना निवेदने देऊन पुतळा सन्मानपूर्वक हटविण्याची मागणी केली होती. मात्र, कोणतीही प्रशासकीय कारवाई न झाल्याने एमपीएने अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Vasco News | छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पोलीस बंदोबस्त
Supreme Court | छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हटविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कायम

सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुतळा सन्मानपूर्वक हटविण्याचे आदेश दिले. तसेच पुतळा हटविताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक आणि संबंधित यंत्रणांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याची विशेष काळजी घ्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर सध्या पुतळ्याभोवती लोखंडी बॅरिकेड्स उभारण्यात आले असून, परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सदा परिसरात परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news