Vasco Crime Case | क्षुल्लक वादातून टोकाचे पाऊल; वास्कोमध्ये 27 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Vasco Crime Case | स्वयंपाकघरात पती-पत्नीमध्ये वाद झाल्यावर २७ वर्षीय पत्नीने बेडरूममध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.
Goa Christmas Celebration 2025
Goa Christmas Celebration 2025
Published on
Updated on

वास्को : पुढारी वृत्तसेवा

स्वयंपाकघरात पती-पत्नीमध्ये वाद झाल्यावर २७ वर्षीय पत्नीने बेडरूममध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे ओडिशाचे परंतू कामाधंद्यानिमित्त सांकवाळ येथे सदर पती-पत्नी राहतात.

Goa Christmas Celebration 2025
Goa Politics | आमदाराच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पंतप्रधानांच्या कोर्टात

२३ डिसेंबरला रात्री दहा वाजता जेवणानंतर, पती पत्नीमध्ये स्वयंपाकघरात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यामुळे संतापलेली पत्नी बेडरुममध्ये गेली. तीने आतून दार बंद केले. तीने छताच्या पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतला. या दरम्यान पतीने बेडरुमचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. तथापी ते शक्य झाले नाही.

Goa Christmas Celebration 2025
Goa Politics | आमदाराच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पंतप्रधानांच्या कोर्टात

त्यामुळे त्याने शेजारयांना मदतीला बोलाविले. त्यांनी दरवाजा फोडून उघडला. तेव्हा पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले. शेजारयांनी तीला खाली उतरून उपचारासाठी कासावली आरोग्य केंद्रात नेले. तेथून तीला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे मृत घोषित करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news