

वास्को : पुढारी वृत्तसेवा
येथे नव्याने बांधण्यात आलेल्या मासे मार्केट इमारतीच्या तळमजल्याखाली वाहने उभी करण्याची सुविधा असतानाही वाहनचालक तेथे वाहने उभी करण्याचे नाव घेत नाही. तेथे वाहने उभी करण्याऐवजी पूर्वीप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे इतर बाहनांना तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे.
याप्रकरणी वाहनचालकांनी वाहने रस्त्यावर, पदपथावर उभी करण्याऐवजी पार्किंग जागेत उभी करावी, असे आवाहन मुरगावचे नगराध्यक्ष गिरिष बोरकर यांनी केले आहे. मुरगाव पालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या मासे मार्केटाचे उद्घाटन दहा दिवसांपूर्वी करण्यात आले आहे. ग्राहक, विक्रेत्ते यांचा विचार करून सदर मार्केट बांधण्यात आले आहे.
मार्केटात येणाऱ्या ग्राहकांना वाहने उभी करण्याची खास सुविधा येथे उपलब्ध करण्यात आली आहे. इमारतीच्या तळमजल्याखाली दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था आहे. तथापि, या पार्किंगचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. पार्किंगच्या ठिकाणी वाहने उभी करण्याऐवजी वाहनचालक रस्त्याकडेला व पदपथावरच वाहने उभी करीत आहेत. एकामागे एक दुचाकी उभ्या केल्याने वाहने बाहेर काढण्यास अडचण होत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी वाहने उभी करण्यात येत असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या चारचाकी वाहनांना अडथळा होत आहे.
जागृती निर्माण करावी याप्रकरणी संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे. पार्किंगच्या जागी वाहने उभी करण्यात यावीत यासाठी वाहनचालकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे. नाही तर पार्किंगची जागा अडगळीची जागा ठरण्याची भीती नाकारता येत नाही.
जागृती निर्माण करावी
याप्रकरणी संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे. पार्किंगच्या जागी वाहने उभी करण्यात यावीत यासाठी वाहनचालकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे. नाही तर पार्किंगची जागा अडगळीची जागा ठरण्याची भीती नाकारता येत नाही.