Vasco GPay Fraud Case| मालकाच्या मोबाईलचा गैरवापर करून ड्रायव्हरकडून लाखोंची लूट

Vasco GPay Fraud Case| वास्को पोलिसांची तत्काळ कारवाई; चालकावर आयटी अॅक्टसह गुन्हा दाखल
Google Pay Features
Gpay FeaturePudhari
Published on
Updated on

वास्को : पुढारी वृत्तसेवा

आपल्या नकळत आपल्या ड्रायव्हरने आपल्या मोबाईलमधील जीपे अॅपचा वापर करून गेल्या साडेपाच महिन्यांत २ लाख ४० हजार रुपयांची रक्कम काढून फसवणुक केल्याची तक्रार विद्यानगर दाबोळी येथील विनायन यांनी वास्को पोलिस स्थानकात केली आहे.

Google Pay Features
Night Club Fire Case | हे प्रकरण अत्यंत गंभीर! हडफडेतील दुर्घटनाप्रकरणी रोहिणी न्यायालयाचे लुथरांवर कडक शब्दात ताशेरे

वास्को पोलिसांनी याप्रकरणी चालक शंकर बाबू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायन यांच्याकडे शंकर बाबू हा चालक म्हणून काम करतो. तो त्यांच्या घरामध्येच राहतो.

शंकर याने विनायन यांच्या मोबाईल फोनमधील जीपे अॅपची अप्रामाणिक हेतूने माहिती मिळविली. त्यानंतर त्याने त्या माहितीचा वापर करून विनायन यांच्या नकळत त्यांच्या बँक खात्याशी जोडलेल्या जीपे ॲपद्वारा पैसे काढण्यास आरंभ केला. सदर प्रकार ३० मे २०२५ पासून आजतागत चालू होता.

Google Pay Features
Goa Sewage Issue | रिसॉर्टचे सांडपाणी बाहेर; ग्रामस्थांत संताप

शंकर याने सदर रक्कम त्याचा मित्र संकेत याच्या नावावर असलेल्या दुसऱ्या बँकेतील खात्यावर वळती केली होती. त्यानंतर ती रक्कम त्याचा दुसरा मित्र मिठू कुमार याच्या बँक खात्यामध्ये पाठविली.

सदर प्रकरण कोणाच्याही लक्षात येऊ नये यासाठी शंकरने खबरदारी घेतली होती. तथापी सदर प्रकार उघडकीस आल्यावर विनायन यांनी पोलिस स्थानकात तक्रार केली. वास्को पोलिसांनी भारतीय न्यास संहिता २०२३ च्या ३१८, ३१६ (४) कलमाखाली तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६ (क) कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news