Valpoi Sattari Cyclone | सत्तरीत निसर्गाचे तांडव! चक्रीवादळाचा खोतोडासह 5 गावांना जोरदार फटका; लाखो रुपयांची हानी

Valpoi Sattari Cyclone | खोतोडा, मलपण, शिरसोडा, सुरंगुली येथे अनेक घरांचे नुकसान; वीजपुरवठा खंडित
Cyclone Michaung Update
Cyclone Michaung Update
Published on
Updated on

वाळपई : पुढारी वृत्तसेवा

सत्तरी तालुक्यातील खोतोडा पंचायत क्षेत्रातील खोतोडा, मलपण, शिरसोडा, सुरंगुली आणि धारगे या भागांना गुरुवारी रात्री उशिरा चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीत अनेक घरांचे नुकसान झाले असून कुटुंबांवर मोठे संकट ओढवले आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

Cyclone Michaung Update
Goa Soham Naik Case | नराधम सोहम नाईकचा सैतानी चेहरा! एकाच कुटुंबातील ३ सख्ख्या बहिणींचे लैंगिक शोषण; गोव्याला फुटला घाम

वाळपई अग्निशामक दलाने रात्रभर युद्धपातळीवर काम करत घरांवर पडलेली झाडे हटवून मोठ्या प्रमाणात मालमत्ता वाचवली. प्राथमिक अंदाजानुसार या आपत्तीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ सर्वेक्षण करून अहवाल सरकारकडे सादर करावा आणि बाधितांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पंचायत सरपंच प्रतिमा बंडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्थानिक आमदारांशी संपर्क साधून मदतीचे आश्वासन दिले तसेच सरकारने या प्रकरणाकडे गांभीयनि लक्ष द्यावे, अशी मागणी केली. बुधवारी रात्रीपासून विजांचा कडकडाट व उष्णतेचे वातावरण होते. त्यानंतर आलेल्या जोरदार वादळामुळे खोतवाडा, गव्हाणे, मलपण, रंगोली, आसोडा, शिरसोडा आणि धारगे या भागांत मोठे नुकसान झाले.

सुरंगुली भागाला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. येथील लक्ष्मी गावकर यांच्या घरावर झाड कोसळून सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले, तर अग्निशामक दलाने सुमारे ४० हजार रुपयांची मालमत्ता बाचवली.

नीळकंठ गावकर यांच्या घरावरही झाड पडून सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीजखांब मोडल्याने व तारा तुटल्याने परिस्थिती गंभीर बनली असून वीज विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. धारगे येथे एकनाथ गावकर यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाने सुमारे १ लाख रुपयांची मालमत्ता वाचवली.

Cyclone Michaung Update
Goa Vehicle Registration | गोव्याच्या रस्त्यांवर सणासुदीचा 'वेग'! गुढीपाडवा अन् ईदच्या मुहूर्तावर 3,119 नव्या गाड्यांची नोंदणी

कुळे-शिगांवात मोठी पडझड

बुधवारी रात्री सुमारे दहाच्या सुमारास कुळे-शिगांव पंचायत क्षेत्रात विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अनेक घरांवर व दुकानांवर झाडे कोसळल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच वीजवाहिन्यांवर फांद्या पडल्यामुळे सात ते आठ वीजखांब मोडून पडले आणि वीजपुरवठा खंडित झाला. सरपंच गोविंद शिगावकर, पंच सदस्य साईश नाईक आणि बेनी आझावेदो यांनी मदतकार्य केले. कुडचडे येथून दोन अग्निशामक दलांना पाचारण करण्यात आले असून त्यांनी झाडांच्या फांद्या घटनेत प्रसाद वेळीप यांच्या वाहनाचे नुकसान झाले.

बबीता बांदोडकर यांच्या घरावर फांदी पडून मोठी हानी झाली, तर सागर अगरवाल यांच्या घरावर माड कोसळल्याने नुकसान झाले. तसेच मार्यान फर्नांडिस, मारुती आणि डोविता यांच्या घरांवर व शौचालयावर झाडांच्या फांद्या पडून नुकसान झाले असून माटोजे आणि कार्यामळ भागातही पडझड झाल्याची माहिती आहे. कुळे बाजार परिसर वगळता इतर भागात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. सरपंच गोविंद शिगांवकर, पंच सदस्य साईश नाईक आणि बेनी आझावेदो यांनी संपूर्ण रात्र मदतकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news