

मासिक पाळीचा रक्तस्त्राव असूनही विद्यार्थिनीला शिक्षा पूर्ण करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघड.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रंजिता पै यांनी या घटनेला अमानुष छळ ठरवले.
शिक्षण खाते व महिला आयोग दोघांनीही प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
पालकांनी कोणतीही भीती न बाळगता तक्रार करावी, कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे.
पणजी : पुढारी वृत्तसेवा
माझे वडील जेव्हा राजकारणात होते तेव्हा गुन्हेगारांसह सरकारी अधिकाऱ्यांनाही चुकीचे कृत्य करताना एक प्रकारची भीती होती. ती भीती आजच्या सरकारबद्दल उरलेली नाही. लोकांच्या मनात प्रशासनाबद्दल पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवश्यक पावले उचलण्यासाठी मी त्यांना विनंती करतो, असे प्रतिपादन उत्पल पर्रीकर यांनी केले.
पणजीत माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उत्पल म्हणाले की, मनोहर पर्रीकर यांचे समाजकार्य बघतच लहानाचे मोठे झालो. लोकांप्रति त्यांच्या मनात असलेली करुणा आणि सेवा मी जवळून अनुभवली आहे.
आज ते नसतानाही आमच्या हृदयात जिवंत आहेत. सध्या राज्यात सुरू असलेल्या गोष्टी मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. हडफडे येथील घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना गोव्याबद्दल कायमस्वरूपी कटू आठवणी लक्षात राहतील.
अशा अवैध काम कामांमध्ये गुंतलेल्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांवरही लुथरा बंधूप्रमाणेच प्रमाणेच कडक कारवाई व्हावी. प्रकरणात गुंतलेला सर्वांवर सरकारने कारवाई करत पुन्हा अशा गोष्टींसाठी परवानगी देण्यासाठी कोणताही सरकारी अधिकारी धजावणार नाही, यासाठी मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत.
माझे वडील असताना ती भीती होती. मात्र आता कोणच कुणाला जुमानत नसल्याचे चित्र आहे. गोव्याची ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी नमूद केले.