Goa accident news: कोल्हापूरहून वाळपईकडे जाणाऱ्या दुधाच्या टेम्पोला अपघात; वीजेच्या खांबाला धडकला...; नेमकं काय घडलं?

तांबडीघाट-उसगाव उतरणीवर बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात दुग्ध टेम्पोला अपघात झाला.
Milk tempo accident
Milk tempo accidentFile Photo
Published on
Updated on

Goa accident news

उसगाव : गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात दुग्ध टेम्पोला अपघात झाला. हा अपघात बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास तांबडीघाट-उसगाव उतरणीवर घडला. रस्त्यावर अचानक गुरे आल्याने त्यांना वाचविताना चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला. त्यानंतर टेम्पो वीज खांब व कुंपणाला धडकून उलटला.

Milk tempo accident
Goa Factory Accidents | गोव्यात कारखान्यांमधील सुरक्षेचा बोजवारा! 4 वर्षांत 138 अपघातांत 20 कामगारांचा बळी

हा दुग्ध टेम्पो (एमएच ०७ एजे ०७३६) कोल्हापूरहून उसगावमार्गे वाळपईकडे जात होता. श्री दुल्ल इंडिया प्रा. लि., सदाशिवनगर, हमीदवाडा, कागल, कोल्हापूर येथून ‘डिलिशिया’ नामक दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ घेऊन हा टेम्पो वाळपईकडे निघाला होता.

तांबडीघाट-उसगाव उतरणीवर अचानक गुरे रस्त्यावर आल्याने चालकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि टेम्पो रस्त्यालगतच्या वीज खांब व कुंपणाला धडकून उलटला.

ढवळी येथे बस अपघात; तीन प्रवासी जखमी

फोंडा : फोंड्याहून मडगावला जाणाऱ्या प्रवासी बसला मंगळवारी सायंकाळी ढवळी येथे अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसची वीज खांबाला धडक बसली. त्यानंतर बस रस्त्यालगतच्या गटारात एका बाजूला कलंडली. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले.

जखमींमध्ये महंमद रफीक मुजावर (२७, मडगाव), कुमकुम हरीलाल चौधरी (२१, टॉपकोला-बोरी) आणि ज्योती सावईकर (५४, ढवळी) यांचा समावेश आहे. तिन्ही जखमींना उपचारासाठी फोंडा आयडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Milk tempo accident
Goa Crime News | गोव्यात आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश! ईडीकडून विशेष न्यायालयात पाच जणांवर पुरवणी तक्रार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news