Goa Crime News | गोव्यात आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश! ईडीकडून विशेष न्यायालयात पाच जणांवर पुरवणी तक्रार

Goa Crime News | या संशयितांमध्ये निहाल वडाक्कनचेरी नाझर, प्रसोभ पी. के., अल्फिन थॉमस, धीरज मॅथ्यूज व निशांत प्रताप यांचा समावेश आहे.
Drug Case
Drug Case Pudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीप्रकरणी गोव्याच्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात अतिरिक्त आणखी पाच संशयितांविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) पुरवणी तक्रार दाखल केली आहे. या संशयितांमध्ये निहाल वडाक्कनचेरी नाझर, प्रसोभ पी. के., अल्फिन थॉमस, धीरज मॅथ्यूज व निशांत प्रताप यांचा समावेश आहे.

Drug Case
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

ईडीने गेल्या मार्च २००६ मध्ये अमलीपदार्थविरोधी कक्षाने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे संशयित मधुपान सुरेश शशिकला यांच्यासह सातजणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तपासादरम्यान ईडीच्या असे निदर्शनास दिसून आले की संशयितांनी २०१६ पासून संघटित आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ड्रगच्या बेकायदेशीर तस्करीतून सुमारे ३.९६ कोटी रुपयांची अवैध कमाई झाल्याचे उघड झाले होते.

या तपासावेळी हायटेक डिजिटल कनेक्शनही त्यावेळी समोर आले होते. याप्रकरणाच्या सखोल चौकशीवेळी ईडीने या ड्रग तस्करीतून जमा केलेला पैसा विविध बँकिंग ट्रान्झॅक्शनचा वापर करून दुबईला पाठवला होता.

Drug Case
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

तेथे या पैशाचे क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतर करून त्याचा डिजिटल चलनाच्या वापरात आणून डार्क वेबद्वारे पुन्हा नवनवीन ड्रग पदार्थांची खरेदी करण्यासाठी त्याचा उपयोग केला जात होता. या नव्याने दाखल केलेल्या तक्रारीतील पाच संशयितांनी या बेकायदेशीर पैशांची निर्मिती, खरेदी, लपवाछपवी तसेच क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर करण्याच्या कारस्थानात ते सामील असल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान, ईडीने नुकतीच १६ सप्टेंबर रोजी संशयित अनाम चरण प्रधान याची सुमारे ९.४० लाखांची तर उत्तम चंद याची १७.४८ लाखांची अचल मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. देशभरात नशामुक्त भारताचा संकल्प सुरू करण्यात आल्यापासून ड्रग माफिया तसेच त्याच्याशी संबंधित टोळ्यांना गजाआड करण्यासाठी विविध यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news