Ponda Theft News | फोंडा परिसरात चोरांच्या टोळीचा धुमाकूळ; फोंड्यात एकाच रात्री तीन चोऱ्या

Ponda Theft News | दोन मंदिरे, बंगला फोडला; रोकडसह दागिने लंपास
Ponda Theft News
Ponda Theft News
Published on
Updated on

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत बुधवारी रात्री तीन ठिकाणी चोऱ्या करण्यात आली. उसगाव आणि ढवळी येथील दोन देवळांसह बोरीतील एका बंगल्यावर या धाडसी चोऱ्या झाल्या आहेत. फोंडा पोलिसांना हे मोठे आव्हान असून पोलिस तपास सध्या सुरू आहे.

Ponda Theft News
Panjim Casino | मांडवीतील नव्या 'महाकाय' कॅसिनोला पणजीकरांचा कडाकड विरोध; महापालिकेत नागरिकांचा ठिय्या

पार-उसगाव येथील भवानी सिद्धपुरुष देवालयात चोरट्यांनी चोरी करून देवीचे पुरातन सोन्याच्या दागिन्यांसह फंडपेटी फोडली. हे दागिने पुरातन असून त्यांचे वजन आणि इतर माहिती उपलब्ध नाही तरीपण १० ते १५ लाख रुपये किमतीचे दागिने आणि फंडपेटी फोडून आतील पैसे लांबवले.

सकाळी देऊळ उघडायला आल्यावर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. खिडकीचे ग्रिल्स कापून चोरट्याने देवालयात प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा डोक्यावर हेल्मेट घातलेल्या स्थितीत देवळात प्रवेश करताना पाठमोरा टिपला गेला आहे. त्यामुळे अन्य चोरटे देवळाबाहेर होते की चोर एकटाच होता हे समजू शकले नाही.

ढवळी-फोंडा येथील सत्यनारायण मंदिरातही चोरट्यानी फंडपेटी फोडून आतील सुमारे १० हजार रुपयांची रोकड पळवली. मागील भागाकडील दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला पण गर्भकुडीचा दरवाजा ते तोडू शकले नाहीत मात्र फंडपेटी फोडण्यात चोरटे यशस्वी झाले. तिसऱ्या घटनेत बोरी सर्कल भागात रस्त्याच्या कडेला असलेला बंगला चोरट्यांनी फोडला.

बोरी पंचायतीचे माजी सरपंच लुईस कॉस्टा यांच्या घरी ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील १ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच २० हजार रुपयांची रोखड तसेच कपाटातील महागड्या दारुच्या वाटल्या पळवल्या. सोनसाखळी तसेच अंगठी कानातील सोन्याचे दागिने यांचा त्यात समावेश आहे.

महागड्या दारुच्या सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या वीस बाटल्या चोरांनी पळवल्या. लुईस कॉस्टा हे नोकरीसाठी पत्नीसह विदेशात असतात. घरी लुईस यांची आई आणि मुलगा असतो. लुईस यांची आई दिवसभर या बंगल्यात असतात.

मात्र रात्र झाली की ती नातवंडासह मूळच्या घरी झोपायला जातात. सकाळी हा चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या तिन्ही चोऱ्यांप्रकरणी फोंडा पोलिसांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.

Ponda Theft News
Dabolim Airport | दाबोळी विमानतळावरून गोव्यात राजकीय संघर्ष पेटला; विरोधक आक्रमक, मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

यावेळी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करून तपास सुरू करण्यात आला. तिन्ही चोऱ्या करण्यापूर्वी चोरट्यांनी रेकी केली असावी आणि पूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतरच ही चोरी केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तिन्ही चोऱ्या चोरांच्या एकाच पथकाने केल्या की वेगवेगळ्या चोरांनी याचा तपास पोलीस करीत आहेत.

पोलिसांसमोर आव्हान...

चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी धाडसी चोऱ्या करून पोलिसांना आव्हानच दिले आहे. या तिन्ही चोऱ्यांतील चोरटे एकाच टोळीतील आहेत का, याचा शोध पोलिस घेत आहेत. विशेष म्हणजे चोरटे दारुडे असावेत असा कयास व्यक्त करण्यात येत असून चोरट्यांनी दारुच्या वाटल्या लंपास केल्या आहेत त्यामुळे पोलिस त्या अनुषंगानेही तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news