Margao Carnival Parade 2026 | कार्निव्हल हा परंपरा जपणारा उत्सव

Margao Carnival Parade 2026 | पर्यटनमंत्री रोहन खंवटे : मडगावात अबालवृद्धांचा अमाप उत्साह
Goa Carnival.
Goa Carnival.
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

कार्निव्हल हा गोमंतकियांचा केवळ मौजमजेसाठीचा महोत्सव नसून तो परंपरा जपणारा उत्सव आहे. त्यामुळे हा उत्सव जबाबदारीने साजरा करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी केले.

Goa Carnival.
Election Goa | सासू-सून आगरवाडा-चोपडेच्या कारभारीण

मडगाव येथे झालेल्या कार्निव्हल परेडच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. ते म्हणाले, गोमंतकीय परंपरा जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. कार्निव्हल हा राज्याच्या सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वाचा भाग असून तो उत्साहात आणि शिस्तीत साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

बांधकाम मंत्री दिगंबर कामत, मडगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष बबीता नाईक, नगरसेवक कामील बरेंटो, आमदार उल्हास तुयेकर तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचीही प्रमुख उपस्थिती होते.

पारंपरिक पद्धतीनुसार किंग मोमोने मडगाव कार्निवल परेडचा शुभारंभकेला. दरवर्षीप्रमाणे राज्यातील कार्निवल परेडची सुरुवात किंग मोमोच्या घोषणेनंतर झाली. मंत्री कामत म्हणाले, तीन दिवस चालणाऱ्या या कार्निव्हलचा सर्वांनी मनसोक्त आनंद घ्यावा.

Goa Carnival.
Railway Ticket Rules | दहा महिन्यांत 22.81 कोटींचा दंड वसूल

राज्याची परंपरा मोठ्या उत्साहात आणि एकात्मतेने साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही कार्निव्हल हा गोव्याची पारंपरिक शान असल्याचे सांगितले.

कार्निवलच्या निमित्ताने गोमंतकीय कलेचे प्रदर्शन करण्याची उत्तम संधी उपलब्ध होते. त्यामुळे सर्व गोमंतकियांनी या उत्सवात आवर्जून सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news