South Goa District Hospital | रुमडामळ हौसिंग बोर्ड येथील वादाला हिंसक वळण

South Goa District Hospital | परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त; बिफ स्टॉल हटवल्याने तणाव निवळला
South Goa District Hospital
South Goa District Hospital
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

रुमडामळ हौसिंग बोर्ड परिसरातील मंदिराजवळ सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर बिफ स्टॉलवरून निर्माण झालेला वाद शनिवारी (दि.६) रात्री हिंसक वळणावर पोहोचला. स्टॉलला विरोध करणाऱ्या गोरक्षा समिती आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र त्यापूर्वीच संबंधित स्टॉलधारकाने स्वतःहून स्टॉल हटविल्याने संभाव्य संघर्ष टळला.

South Goa District Hospital
JAIPUR ALERT | जयपूरमध्ये हाय अलर्ट! मंदिरांबरोबर मशीद हटविण्यापूर्वी इंटरनेट सेवा खंडित; शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

तरीही परिस्थिती संवेदनशील असल्याने प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. गेल्या काही महिन्यांपासून रुमडामळ हौसिंग बोर्ड परिसरातील मंदिराजवळ सुरू असलेल्या बिफ स्टॉलला स्थानिक नागरिक आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध होता. धार्मिक स्थळाच्या परिसरात अशा प्रकारचा व्यवसाय सुरू ठेवणे अयोग्य असल्याचा दावा करत वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या होत्या.

मात्र, या प्रश्नावर ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी वाढत होती. शनिवारी (दि.६) रात्री हा वाद अधिक चिघळला. बजरंग दलाच्या गोरक्षा समितीचे पदाधिकारी भगवान रेडकर हे संबंधित स्टॉलवर गेल्यानंतर त्यांच्यावर स्टॉलधारकाने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. या मारहाणीत रेडकर जखमी झाले असून त्यांच्यावर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

South Goa District Hospital
Thane Crime : मिरा रोड सोसायटीत बकरे आणल्याने वाद चिघळला

घटनेनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. नंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. या घटनेनंतर बजरंग दल, गोरक्षा समिती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शनिवारी (दि.६) आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले. न्याय दंडाधिकारी, पंचायत अधिकारी, आरोग्य विभाग तसेच इतर संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

स्टॉलसाठी आवश्यक परवानग्या आणि नियमांचे पालन करण्यात आले आहे का, याची तपासणी करण्यात आली. प्राथमिक चौकशीत संबंधित स्टॉल बेकायदेशीररीत्या उभारण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्टॉलधारकाने तेथील साहित्य हटवून स्टॉल काढून टाकला. त्यामुळे प्रस्तावित आंदोलनाची तीव्रता काहीशी कमी झाली. मात्र, परिसरातील इतर अनधिकृत स्टॉल्सवरही कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. बजरंग दलाचे संयोजक विराज देसाई यांनी सांगितले की, एका युवकाने स्टॉलवर जाऊन मेनू कार्डची मागणी केली असता त्याला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर भगवान रेडकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

South Goa District Hospital
JAIPUR ALERT | जयपूरमध्ये हाय अलर्ट! मंदिरांबरोबर मशीद हटविण्यापूर्वी इंटरनेट सेवा खंडित; शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

रेडकर घटनास्थळी पोहोचताच त्यांच्याशी वाद घालण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा दावाही त्यांनी केला. दुसरीकडे, स्टॉलधारकाच्या समर्थकांनी या प्रकरणाची वेगळी बाजू मांडली आहे. काही व्यक्तींकडून स्टॉल हटविण्यासाठी दबाव आणला जात होता. त्यातून शाब्दिक वाद झाला आणि परिस्थिती चिघळली, असा त्यांचा दावा आहे. या प्रकरणाचे एकतर्फी चित्र रंगविले जात असल्याचेही काही स्थानिकांनी म्हटले आहे.

उर्वरित अनधिकृत संरचना हटवण्याची मागणी

दरम्यान, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी मोर्चा काढून पंचायत प्रशासनाने उर्वरित अनधिकृत संरचना तातडीने हटवाव्यात, अशी मागणी केली. तसेच धार्मिक स्थळांच्या परिसरात बिफ आणि इतर मांसाहारी पदार्थांच्या विक्रीला परवानगी देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली. सध्या रुमडामळ हौसिंग बोर्ड परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी वातावरण पूर्णपणे निवळलेले नाही. धार्मिक भावना, बेकायदेशीर व्यावसायिक आस्थापना आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न यांमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news