

गोव्यातील प्रत्येक गावाला स्वतःचा ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक ओळख आणि भौगोलिक वैशिष्ट्ये लाभलेली आहेत. प्रत्येक गावातील वनस्पतीसृष्टी, वन्यजीव, ऐतिहासिक व धार्मिक वास्तू आणि लोकपरंपरा यातून त्या गावाचे वेगळेपण उलगडते. निसर्ग आणि इतिहास यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणारे तांबडी सुरला हे गोव्यातील असेच एक वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे.
सह्याद्रीच्या हिमालयार कुशीत वसलेल्या या गावाचे प्राचीन इतिहास, समृद्ध जैवविविधता, धार्मिक श्रद्धा आणि लोकसंस्कृतीचा अनमोल ठेका आजही जपून ठेवला आहे.
गोव्यातील धारबांदोडा तालुक्यात वसलेले तांबडी सुरलं हे ऐतिहासिक आणि निसर्गाचे गाव भगवान महावीर वन्यजीव अभयारण्याच्या परिसरात येते. एका बाजूला सत्तरी तालुक्यातील महादयी वन्यजीव अभयारण्याची सीमा या परिसराला स्पर्श करते.
घनदाट जंगल, समृद्ध वनस्पतीसृष्टी, विविध पक्ष्यांचा किलकिलाट, डोंगरदुड्या आणि खळखळणारे झरे यांमुळे गावाला निसर्गाचे अनोखे वरदान लाभले आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात कर्नाटकशी घाटमाथ्यावर जाण्यासाठी स्थानिक लोक जंगलातील वाटांचा वापर करीत असत. इतिहासकार प्रा. राजेंद्र वेसकर यांच्या माहितीनुसार, तांबडी सुरलं येथून ईजोळे, वटले आणि पावर्डे मार्ग करंवलं येथे पोहोचता येत असे, तेथून गोव्यातील कदंब राजघराण्याची महत्त्वपूर्ण राजधानी असलेल्या हळशी येथे जाणे शक्य होते. या प्रवासासाठी महादेव मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या 'राणीची पाज' या वाटेचा वापर केला जात असे.
या प्राचीन जंगलाटावरून तांबडी सुरलं तकालीन दलमथपालातील महात्म्य लक्षात येते.
सांगे तालुक्याच्या जुन्या प्रशासकीय रचनेत अटाधार आणि हेमाड बार्से असे दोन महाल होते. तांबडी सुरलाच्या हेमाड बार्से महालात होत असे. सुमारे ६,४२० हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या गावाचा बहुतांश भाग जंगलांनी व्यापलेला आहे. गावात प्रवेश करताच निसर्गाच्या सानिध्यात आल्याची जाणीव होते. आम्ही गावात पोहोचलो, तेव्हा कांसार अर्थात तांबट या पक्ष्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने आमचे स्वागत केले. जंगलाच्या शांततेत होणारा हा आवाज जणू गाणाऱ्या समृद्ध जैवविविधतेची ओळख करून देत होता.
बोड्येर येथील वैशिष्ट्यपूर्ण तेलको गुण्यो, तयडे येथील देवा साकवाची शिलाखंडोमी केलेली रचना आणि येथील धबधबा ही या परिसराची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. येथे निसर्ग, श्रद्धा आणि पारंपरिक प्राथपथ्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.
तांबडी सुरलाची ओळख सांगताना येथील प्राचीन महादेव मंदिराचा उल्लेख अपरिहार्य आहे. गोव्यातील अनेक प्राचीन धार्मिक वास्तू राजकीय सत्तामधील बदल आणि काळाचे आघात अनुभवले; मात्र तांबडी सुरला येथील महादेव मंदिर आजची आपली ऐतिहासिक वैभवाची साक्ष देत आहे. खाडा नदीच्या डाव्या किनाऱ्यावर, घनदाट जंगलाच्या सानिध्यात वसलेले हे तेरावे शतकातील कदंबकालीन शिवमंदिर गोव्याच्या स्थापत्य वारसातील एक महत्त्वपूर्ण स्मारक आहे. दाढी बाडाकाम, वैशिष्ट्यपूर्ण वास्तूरचना आणि समोतावाने निसर्गासौंदर्य यांमुळे या मंदिराला एक वेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने राष्ट्रीय महत्त्वाचे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले महादेव मंदिर सभागंड, अंतराळ आणि गर्भगृह अशा तीन प्रमुख भागात विभागलेले आहे. मंदिराचे मुख पूर्व दिलेला असून, पहाटेच्या वेळी उगवत्या सूर्याची किरणे गर्भगृहातील शिवलिंगावर पडतील अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आल्याचे सांगितले जाते. यावरून तत्कालीन स्थापत्यकारांचे निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण आणि सूर्यप्रकाशाच्या वास्तूचुकेने केलेला विचार लक्षात प्राप्त झाली आहे.
या चार खांबांपैकी एका खांबाच्या तळाशी घोडायाच्या तुडवणाऱ्या हाथीचे शिल्प कोरलेले आहे. हे शिल्प कदंब राजघराण्याच्या राजदिनांशी संबंधित असल्याचे मानले जाते. मंदीरातील कोरीव काम, दाढी खांब आणि मूर्तिशिल्पे यातून तत्कालीन स्थापत्यकारांचे कौशल्य आणि कलात्मक जाणिवा स्पष्ट होतात.
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निसर्गाशी बसलेले त्याचे आटरे नाते आहे. मंदिराभोवती पसरलेले घनदाट जंगल, उंच वृक्षाराजी आणि जवळून वाहणारे नदीचे पाणी यामुळे परिसराला एक वेगळे सौंदर्य लाभले आहे. नदीचा खळखळखाट, हिरवाई आणि जंगलातील शांतता यांत इतिहास आणि निसर्ग यांची एकरूपता अनुभवायला मिळते. शतकानुशतके काळाचे बदल सहून करणारे आपले अस्तित्व टिकवून ठेवलेले हे मंदिर गोव्याच्या ऐतिहासिक स्मृतीचे प्रतीक आहे.
महादेव मंदिराच्या परिसरातील निसर्गसौंदर्य अनुभवताना जवळच्या तांबडी सुरला धबधब्याचा उल्लेख विशेष महत्त्वाचा ठरतो. पावसाळ्यात डोंगरदऱ्या हिरवाईने नटतात आणि उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या खळखळाट वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतो.
धबधब्याभोवती पसरलेली हिसीगार वनराई आणि ओलंवर मातीचा सुगंध मन प्रसन्न करतो. या भागातील वनस्पतीसृष्टी आणि पक्ष्यांचे वैविध्य निसर्गनिरीक्षणासाठी महत्त्वाचे आहे. घनदाट जंगलामुळे या परिसराला जैवविविधतेच्या दृष्टीने विशेष स्थान प्राप्त झाले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना केवळ नयनरम्य दृश्यांचा आनंद मिळत नाही, तर निसर्गाचे संवर्धन किती आवश्यक आहे, याची जाणीव होते.
तांबडी सुरलाच्या सांस्कृतिक वैभवात येथील देवरायांचे स्थान अन्यसाधारण आहे. तसेच येथे येथील देवांमध्ये असलेले ब्राह्मणी मायेचे मंदिर प्राचीन शिल्पवैभवाची विशेष उल्लेखनीय आहे. पारंपरिक लोकशैलीत घडविलेली येथील शिल्पे तत्कालीन कलात्मक अभिव्यक्ती आणि समाजजीवनाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. मंदिरातील शिल्पामध्ये मोर, शस्त्रसज्ज व चिलखतधारी योद्धा आणि कामुकतेशी संबंधित दृश्ये आढळतात.
याशिवाय पंचमुखी हनुमानची प्रतिमा आणि गजआरुढ देवतेची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती मंदिराच्या कलात्मकतेत भर घालतात. या शिल्पांमध्ये केवळ धार्मिक प्रतीक म्हणून न पाहता, तत्कालीन लोकजीवन, कलादृष्टी आणि सांस्कृतिक परंपरा समजून घेण्याच्या दृष्टीने पायरसयक आहे, असा दुर्गम भागिर्जीमध्ये आणि देवरायांमध्ये जतन झालेला वारसा गोव्याच्या इतिहासातील अनेक अज्ञात पैलूंकड प्रकाश टाकू शकतो. या वस्तूंचे योग्य दस्तऐवजीकरण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे.
तांबडी सुरला हे गाव म्हणजे केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर गोव्याच्या प्राचीन इतिहासाचे, लोकश्रद्धेचे, स्थापत्यकलेचे आणि समृद्ध जैवविविधतेचे जिवंत प्रतीक आहे. येथील जंगलावाटा जुन्या दळणवळणाच्या इतिहासाची आठवण करून देतात, देवराया स्थानिक श्रद्धा आणि निसर्गसंवर्धन यांचे नाते स्पष्ट करतात, तर प्राचीन मंदिरे आपल्या पूर्वजांच्या कलात्मक कौशल्याची साक्ष देतात.
वारसास्थळांचे जतन करताना केवळ मंदिर आणि शिल्पांचे संरक्षण पुरेसे नाही. त्याभोवतीची जंगले, जलस्रोत, वन्यजीव आणि स्थानिक समुदायाचे पारंपरिक ज्ञान यांचेही संवर्धन होणे आवश्यक आहे. पर्यावरण विकास करणाऱ्या पर्यावरणाचा समतोल राखणे आणि या भागाचे नैसर्गिक स्वरूप अबाधित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
तांबडी सुरला गावाची प्रमुख ग्रामदेवता स्त्री बाराभुमिका देवी आहे. बोरयामळ, महाकण, साकवडा, तयडे, धाऱणे, बोडूर, केरी, तांबडी, सुरला, करिश्मळ, मथलावाडा आणि गांर्देर अशा परिसरांता बाराभुमीमध्ये समावेश होतो. या भागातील देवदेवता, प्राचीन मूर्तिशिल्पे आणि स्थानिक श्रद्धा गावाच्या सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देतात.
बोरयामळ येथील मंदिरात असलेली केळबाय रूपातील गजलक्ष्मीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती या परिसराच्या प्राचीन कलावैभवाची आठवण करून देते. खड्ग धारण केलेल्या आणि रौद्ररूपातील आग्यो व गोरखो बेताळ यांच्या प्रतिमा घनदाट जंगलाच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्ष वेधून घेतात, या देवतांशी संबंधित लोकश्रद्धा आणि परंपरा आजही स्थानिकांच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत.