Panjim Crime News | कांपालमधील 30 वर्षीय मजुराच्या हत्याप्रकरणी दोन संशयितांना नाशिकमध्ये घेतले ताब्यात

Panjim Crime News | कांपाल-पणजी येथील दर्या संगम परिसरात कला अकादमीजवळ ३० वर्षीय मजुराची हत्या करून पसार झालेल्या दोन संशयितांना रेल्वे सुरक्षा दलान नाशिक येथे ताब्यात घेतले.
arrested
arrestedPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
कांपाल-पणजी येथील दर्या संगम परिसरात कला अकादमीजवळ ३० वर्षीय मजुराची हत्या करून पसार झालेल्या दोन संशयितांना रेल्वे सुरक्षा दलान नाशिक येथे ताब्यात घेतले.
पणजी पोलीस पाण्याच्या तपास पथकाने दिलेल्या माहितीच्या आधारावर आरपीएफने कारवाई केली.

arrested
Floating Casinos Panajim | तरंगत्या कॅसिनोंमुळे पणजी शहरात वाढती वाहतूक कोंडी; उच्च न्यायालयाचे सरकारला तातडीने कारवाईचे निर्देश

बिहारमधील मजुराचा मृतदेह १६ रोजी घटनास्थळी तात्पुरत्या शेडजवळ आढळला होता. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. धारदार आणि जड वस्तूने त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता.

तपास पथकाने दोघांचा माग काढत नाशिक येथे त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात मुंबईतील कंट्रारदार जगदीशकुमार रांका यांचीही पोलिसांनी चौकशी केली. शेडच्या साफसफाईच्या कामासाठी त्यांनी फोंडा येथून तीन कामगारांना कामावर ठेवल्याचे सांगितले. त्यांनी मृताची ओळख जुम्मा धोबी (वय ३०) अशी पटवून दिली. तो मूळचा चोप्राँग नोन्ह, कैलोर, बिहार येथील रहिवासी होता.

arrested
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

सध्या तो फोंडा येथील दत्तगर्थ भागात राहत होता. हत्येनंतर त्याच्यासोबत काम करणारे अन्य दोघे मजूर गायब झाल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला. आधुनिक तांत्रिक यंत्रणेच्या मदतीने त्यांचे ठिकाण नाशिक येथे असल्याचे समजल्यानंतर पणजी पोलिस ठाण्याचे पथक तातडीने तिथे रवाना झाले.

अजय कुमार उर्फ मंटू तांती (२२) याचा समावेश असून तो बेतोडा, फोंडा येथे राहत असून मूळचा बेगुसराय, बिहार येथील आहे. दुसरा संशयित रितेश कुमार (२६) असून तो स्वर्गीय गोरख पासवान यांचा मुलगा आहे. तो मूळचा भोजपूर, बिहार येथील आहे. २४ तासांत दोघांना ताब्यात घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news