One Goa Project Construction Stay| 'वन गोवा' प्रकल्पाच्या बांधकामाला स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाचा 'हाऊस ऑफ अभिनंदन लोढा'ला दणका
One Goa Project Construction Stay
पणजी : पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. क्लॉड आल्वारिस. सोबत प्रवीणसिंह शेटगावकर, अँथनी डिसोझा, स्वप्नेश शेर्लेकर व ताहीर नरोन्हा.
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कारापूर येथील हाऊस ऑफ अभिनंदन लोढा समूहाच्या महत्त्वाकांक्षी 'वन गोवा' प्रकल्पाच्या बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने दणका बसला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील चार इमारतींच्या बांधकामासह त्यांच्याशी संबंधित तांत्रिक मंजुरींनाही स्थगिती देण्यात आल्याने या प्रकल्पाच्या अडचणीत वाढ झाली आहे. या आदेशामुळे प्रकल्पाच्या पुढील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पणजीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गोवा फाऊंडेशनचे संचालक डॉ. क्लॉड आल्वारिस यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. यावेळी प्रवीणसिंह शेटगावकर, स्वप्नेश शेर्लेकर, ताहीर नरोन्हा आणि अँथनी डिसोझा उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने पहिल्या टप्प्यातील चार इमारतींच्या बांधकामावर, तसेच

कामकाज ठप्प

न्यायालयाचा आदेश केवळ प्रत्यक्ष बांधकामापुरता मर्यादित नसून या चार इमारतींसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक मंजुरींनाही स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित इमारतींच्या बांधकामाशी निगडित पुढील प्रक्रिया आणि कामकाजही ठप्प झाले आहे.

संबंधित तांत्रिक मंजुरींवर स्थगिती दिल्याने 'वन गोवा' प्रकल्पाच्या भवितव्याबाबत आता न्यायालयीन प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रवीणसिंह शेटगावकर यांनी दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने शेटगावकर यांची याचिका फेटाळली होती.

One Goa Project Construction Stay
South Goa Drugs Case | दक्षिण गोव्यात अमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम; 9 जणांना अटक, सहा गुन्हे दाखल

या आदेशाला शेटगावकर यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली. या याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने 'वन गोवा' प्रकल्पाला स्थगिती दिल्याने पहिल्या टप्प्यातील चार इमारतींच्या बांधकामाला लगाम, बसला आहे.

One Goa Project Construction Stay
South Goa Drugs Case | दक्षिण गोव्यात अमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम; 9 जणांना अटक, सहा गुन्हे दाखल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.