Subhash Naik Murder Case | बार्देश हादरले! किरकोळ वादातून 63 वर्षीय वृद्धाची निघृण हत्या; म्हापसा पोलिसांकडून दोन संशयितांना बेड्या

Subhash Naik Murder Case | दोघे संशयित कोठडीत; म्हापसा पोलिसांची शिताफीने कारवाई
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

कुचेली, बार्देश येथील एका बारमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन ६३ वर्षीय सुभाष नाईक यांची निघृण हत्या करण्यात आली. या खळबळजनक प्रकरणी म्हापसा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन संशयितांना अटक केली. दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. रविवारी फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी तपास काम पूर्ण केले.

Arrested
Ponda Murder Case | फोंडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! खाजोर्डा खून प्रकरणातील मुख्य आरोपीला 24 तासांत बेड्या

सुभाष नाईक कुचेली येथील संशयित अॅरॉन फर्नाडिस याच्या बारमध्ये गेले होते. तिथे उपस्थित असलेल्या संशयितांशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान अमानुष मारहाणीत झाले. संशयितांनी नाईक यांना लाथाबुक्क्यांनी आणि हाताने गंभीर मारहाण केली होती, असे पोलिस तपासात समोर आले आहे. नाईक हे अधून-मधून या बारमध्ये जायचे. कालांतराने नाईक यांना बरे वाटत नसल्याने, कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असावा असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी नाईक यांना बारमध्ये मारहाण झाल्याचा संशय व्यक्त केला. ग्रामस्थांच्या पाठिंब्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली.

Arrested
Child Mortality Control | बालमृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्य आणि जिल्हा स्तरावर 'लसीकरण कृती दल' स्थापन

शवविच्छेदन अहवालात नाईक यांच्या बरगड्या, कणा मोडल्याचे आणि डोक्याच्या कवटीला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले. या अंतर्गत जखमांमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले.

म्हापसा पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. ज्यात अॅरॉन फर्नाडिस (वय २२, रा. कुचेली) व रामप्रसाद गुईन (वय ४३, रा. कुचेली) यांचा समावेश आहे. रामप्रसाद या बारमध्ये कूक म्हणून कामाला होता. पोलिसांनी या दोघांवर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) आणि ३(५) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्या दृष्टिकोनातून म्हापसा पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news