हिंगोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी गाजवली आर्यमॅन स्पर्धा; 8 तासात केले टास्क पूर्ण

आर्यमॅन स्पर्धा
आर्यमॅन स्पर्धा

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जागतिक आयर्नमॅन संघटनेच्या वतीने पणजी (गोवा) येथे आयोजित आयर्नमॅन स्पर्धा हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी गाजवली. साडेआठ तासात दिलेले टास्क पूर्ण करण्याचे उदिष्ट असताना त्यांनी 8 तासात उदिष्टपूर्ण केले आहे. त्यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आयर्नमॅन पुरस्कार देण्यात आला.

पणजी (गोवा) येथे 13 नोव्हेंबर रोजी स्पर्धा झाली. यामध्ये 33 देशातील 1450 ट्रायॲथलेट यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये 2 किलो मिटर पोहणे, 90 किलोमिटर सायकल चालविणे तसेच 21 किलो मिटर धावणे हा टास्क पुर्ण करण्यासाठी साडेआठ तासाचा वेळ निर्धारित केला होता. यामध्ये 90 किलोमिटर सायकल चालविण्याची स्पर्धा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर घेण्यात आली तर याच भागात 21 किलोमिटर धावण्याचीही स्पर्धा झाली. तर मिरामार बीच येथे 2 किलोमिटर पोहण्याची स्पर्धा झाली. या स्पर्धा सलग पूर्ण करणे आवश्‍यक होते.

यामध्ये हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी सहभाग नोंदविला होता. त्यांनी निर्धारित उदिष्ट आठ तासात पूर्ण केले आहे. त्यांना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पदक देण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यांच्या यशाबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ, आत्माराम बोंद्रे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news