Goa Lairai Devi Yatra stampede | गोव्यातील प्रसिद्ध लईराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी; ७ जणांचा मृत्यू, ३० जखमी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत घटनास्थळी दाखल
Goa Lairai Devi Yatra stampede
Goa Lairai Devi Yatra stampede file photo
Published on
Updated on

Goa Lairai Devi Yatra stampede

गोवा : गोव्यातील शिरगाव येथील प्रसिद्ध लईराई देवीच्या जत्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ७ भाविकांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जखमी झाले आहेत. शुक्रवारपासून लईराई देवीच्या यात्रेला सुरूवात झाली असून दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (दि. ३) पहाटे यात्रेला गालबोट लागले. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत घटनास्थळी पोहोचले आहेत.

Goa Lairai Devi Yatra stampede
गोवा : बेकायदा रेती व्यवसायात बाऊन्सर्सचा प्रवेश

शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रेला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. दरवर्षी हजारो लोक या यात्रेत सहभागी होतात. यात्रेच्या पहिल्याच दिवशी चेंगराचेंगरीची घटना घडली. उत्तर गोव्याचे एसपी अक्षत कौशल यांनी या घटनेची माहिती दिली. गोव्यातील शिरगाव येथील लईराई देवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे ७ जणांचा मृत्यू झाला आणि ३० हून अधिक जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यापैकी पाच भाविकांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना पहाटेची असून जखमींना शेजारील म्हापसा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. काहींना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेठ, निळकंठ हळर्णकर घटनास्थळी पोहोचले आहेत.

थिवी येथील तिघांचा मृत्यू

शिरगाव येथील देवी लईराईच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत थिवी येथील नात्यातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आदित्य कवठणकर (१७, अवचीतवाडो), तनुजा कवठणकर (५२) आणि यशवंत केरकर (४०, माडेल, थिवी) यांचा समावेश आहे.

लईराई देवी मंदिरातील चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी : मुख्यमंत्री सावंत

शिरगाव येथील लईराई जत्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, "या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मी घटनास्थळी गेलो. जखमींवर इस्पितळात उपचार सुरू आहेत. लईराई जत्रेत दरवर्षी ५० हजारांहून अधिक भाविक सहभागी होतात. ही एक दुर्दैवी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन करून या घटनेची माहिती घेतली. त्यांनी केंद्राकडून मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत. आम्ही पुढील ३ दिवस राज्यातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत." असे मुख्यमंत्री सावत यांनी म्हटले आहे.

गोवा काँग्रेसकडून घटनेचा निषेध

लईराई देवी जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल गोवा काँग्रेसने दुःख व्यक्त केले आहे. आम्ही या दुःखद घटनेचा निषेध करतो आणि ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो. सर्व जखमींना लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे, असे पक्षाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news